
मे महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने परभणी जिल्ह्यात मोठा खंड दिला होता. त्यातच यंदा मृग नक्षत्र ही कोरडेच गेले होते. आज संध्याकाळी अचानकपणे पावसाचे वातावरण तयार झालेस आणि शहरासह जिल्ह्यात वादळी वारे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस बरसतोय. मागच्या १५ मिनिटांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरू झालीय. जून महिन्याला हा पहिलाच मोठा पाऊस सध्या सुरू आहे.
या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण आहे
राम बघेल या व्यक्तीवर शनिवारी रात्री हा हल्ला झाल्याची माहिती आहे
लिंबाचे झाड का कापले यातून हा तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे
याप्रकरणी परतवाडा पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे
मारहाण करतानाची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस.
बच्चू कडूंची भेट घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर व जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद उपोषण स्थळी दाखल.
बच्चू कडू यांच्या मागण्या संदर्भात सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांशि सुरू आहे चर्चा..
बच्चू कडू यांची प्रशासनाकडून मनधरणी सुरू
कर्जमाफी होईपर्यंत मागणार नाही बच्चू कडू यांचा निर्धार.
- सुशील हगवणे याला न्यायालयीन कोठडी
- शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
- उद्या या दोघांना पुणे न्यायालयासमोर हजर केलं जाणार
- बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना घेतल्या प्रकरणी सुशील हगवणे याला काल कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं
- आज न्यायालयाने सुशील याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये तुफान वादळी वरे व पावसाला सुरुवात झाली आहे, सलग तिसऱ्या दिवशी कळमनुरी तालुक्याला अवकाळी चा तडाका बसला आहे दरम्यान वादळीवाल्याचा वेग प्रचंड असल्याने बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती तर बाजारपेठेत अनेक पोस्टर्स बोर्ड जमिनीवर कोसळले होते
पुण्याच्या वडगाव पुलावर दोन ट्रकचा अपघात
नॅशनल हायवेवरील मुंबई लेन वडगाव पूल येथे दोन ट्रकचा अपघात
एक ट्रक चालक जखमी आहे इतर कोणी जखमी नाही.
भंडारा जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किमी वेगानं आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. या वादळी वाऱ्यानं भंडारा ते लाखनी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी लगत मोठे वृक्ष महामार्गावर उन्मळून पडल्यानं महामार्गावरील वाहतूक खोळंबली.
धुळे तालुक्यासह जिल्हाभरात विविध ठिकाणी मे महीन्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती, आणि धो धो बरसलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी वेळेआधीच पेरण्या देखील पूर्ण केल्या, परंतु आता जून महिना अर्धा उलटत आला तरी पावसाने उसंत घेतल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे,
जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी वेळेपूर्वीच केली परंतु, आता पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत, पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास दुबार पेरणीच देखील संकट शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.
पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये मुंबई बेंगलोर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त बालेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग करण्यात आली आहेत. त्यातच वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे मुंबई बेंगलोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एलजी कंपनीच्या समोर कारचा टायर फुटून अपघात झाला आहे. टायर फुटल्यानंतर कार दुसऱ्या इंडिका कारवर आदळली. यामध्ये दोन युवक जखमी झाले असून ते युवक सणसवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगाव गावामध्ये वर्षा ओमप्रकाश लाखे या महिलेचा काल सायंकाळी विहिरीत मृतदेह सापडला. सासू, नवरा, सासरा व इतर नातेवाईक यांच्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. तिचा घात केला असा नातेवाईकाचा गंभीर आरोप आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत.
जालन्यात विजेचा धक्का लागून वडिलांसह दोन लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील वरुड गावामध्ये शेतात शेतीकाम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत वडिलांसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. विनोद मस्के यांच्यासह श्रद्धा म्हस्के आणि समर्थ मस्के या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे वरुडसह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
दादरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड.
पेंटाग्राममध्ये ठिणग्या उडत असल्यामुळे रेल्वे प्रवासी सर्व खाली उतरले.
रेल्वे प्रवासामध्ये भीतीच्या वातावरण.
दहा ते पंधरा मिनिटाच्यानंतर पेंटाग्राम खाली करण्यात आला.
आज बुलढाणा शहरात विविध ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक उत्साह आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा केली. सकाळी लवकरच महिलांनी नटून-थटून मंदिरांमध्ये आणि वटवृक्षांच्या आसपास गर्दी केली होती.
पेंटाग्राम मध्ये ठिणग्या उडत असल्यामुळे रेल्वे प्रवासी सर्व खाली उतरले
रेल्वे प्रवासामध्ये भीतीच्या वातावरण
दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर पेंटाग्राम खाली करण्यात आला
बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हीआयपी गेटवर गोंधळ
आमदार आणि नेत्यांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना व्हीआयपी गेटमधून प्रवेश नसल्यामुळे गोंधळ
पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर कार्यकर्त्यांना रोखण्याचे आव्हान
मुख्य मंचाच्या ठिकाणी जाण्यासाठी इस द्वार हे फक्त आमदार आणि नेत्यांसाठी तयार करण्यात आला आहे
दरम्यान नेते आणि आमदारांसोबत आलेले कार्यकर्ते यांना सुद्धा याच गेटने आत जायचं आहे
घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी यासाठी पास देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी नायगाव तहसील अंतर्गतन वाळू घाट ही निश्चित करण्यात आला आहे. मात्र पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे 1777 लाभार्थ्यांपैकी केवळ 98 लाभार्थ्यांनाच मोफत वाळूचा लाभ मिळाला आहे. मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची शेवटची तारीख 9 जून असल्याने पंचायत समिती कार्यालयात वादावादी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुदत संपण्यापूर्वी केवळ 6 दिवस मोफत वाळू देण्यास सुरुवात केल्याने हा प्रकार घडल्याचे आता बोलल्या जात आहे.
रिपाई आठवले गटाच्या महिला आघाडी कडून
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वड पिंपळाच्या झाडांचे वृक्षारोपण
संपूर्ण महाराष्ट्रात आज वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांकडून वटवृक्षाला फेऱ्या मारून पूजा केली जाते. वटवृक्षाचे महत्त्व लक्षात घेता आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या वतीने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. सिने अभिनेत्री संगीता कापुरे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्यानात वड आणि पिंपळाचे वृक्ष लावण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यात कित्येक महिन्यापासून लोड शेडींग केल्या जात आहे तसेच निवडणुकी दरम्यान भाजपा ने दिलेले विज माफीचे आश्वासन पाळले नाही व पावसाळ्या पूर्वी सर्व दुरस्ति चे कामे पूर्ण करावे या मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विज वितरण कार्याल्यावर मोर्चा काढण्यात आला... यावेळी असंख्य शेतकरी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.. जर् मागण्या मंजूर झाल्या नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी दिला आहे..
बदलापूर रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढण्यावरून या दोन प्रवाशांमध्ये वाद झाला आणि स्टेशनमध्येच त्यांनी मारामारी सुरू केली.
मुलाच्या लग्नासाठी रजा मिळावी यासाठी कारागृह प्रशासनाकडे केला अर्ज
कारागृह विभागाचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या मदतीनेच अभय कुरुंदकरणे रजेचा अर्ज केल्याचा गंभीर आरोप
अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप
पोलीस प्रशासनाकडून अभय कुरुंदकर याला रजेसाठी मदत केली जात असल्याचाही राजू गोरे यांनी केला आरोप
अभय कुरुंदकर याला रजात दिल्यास आमच्या जीवाला धोका
याआधीही कुरुंदकरच्या नातेवाईकांनी दिली होती जीवेमारण्याची धमकी राजू गारे यांचा दावा
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पीआय यांच्याकडून ही गैरवर्तन झाल्याचा गोरे यांचा आरोप
नाशिक जिल्ह्यतील कांद्याला मागणी वाढली असून त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे,मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला होता,सध्या नाशिकच्या मोठ्या आकाराच्या कांद्याला डिमांड वाढली आहे,दक्षिणेतील राज्यात झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याला सर्वात जास्त मागणी असल्याने मनमाड बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 1800 तर सरासरी 1500 रुपयांचा दर आज मिळाला
माझी आणि बाप्पाची एक पंतप्रधान सोबत 7 वाजता बैठक आहे मी जाणार आहे, त्या आगोदर कोविड टेस्ट करावी लागते
सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा पक्षाला आज 27 वर्ष झाले
कोणालाही वाटल नव्हते की आपण जन्म आला सत्तेत आलो,18 वर्ष सत्तेत राहिलो, जे आहेत नाहीत सगळ्याचे पक्ष वाढीसाठी योगदान आहे
आर आर आबा,पिचड साहेब आपल्यात नाही त्याची आठवण येते
मी डायरेक्ट टीका करत नाही कारण आपण कधी काळी एका ताटात जेवलो आहे
जे सोबत नाहीत त्यांनाही शुभेच्छा
सहकारी काही सोडून गेले तेव्हा साहेबाना भेटलो त्यावेळी सोबत आले तेवढे आज आहे
अनेक जण गेले,तुम्हाला पण जायचे असेल तर जावा मी परत तरुणांना घेऊन पक्ष उभा करेन
लोकसभा नंतर विधानसभा काय चित्र आलं,त्यावेळी डुप्लिकेट विजय सत्ताधारी यांनी मिळवला आहे
शेतकरी कर्जमाफी आणा असे फडणवीस म्हणाले सातबारा कोरा करू म्हणे,आता त्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणतात 31 तारखे पर्यंत पैसे भरा म्हणतात,
आपण साहेबासोबत राहू- अनिल देशमुख
बीडच्या माजलगाव येथे लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोट दुखू लागल्याने सदरील तरुणीची तपासणी केल्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्याचे समोर आले..ही घटना मे महिन्यात उघडकीस आली असून आता याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.साठवणुक केलेला आणि बाजारात विक्रीसाठी तयार कांदा वादळीवाऱ्यासह पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने कांद्याच्या साठवणुकीवर परीणाम झाला असून कांद्याला ओल लागली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा मिळेल त्या भावात विकावा लागणार आहे परीणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असुन तोंडचा घास हिरावला आहे.
शासनाने दखल न घेतल्याने प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांचं धरणाध्ये उतरून जलसमाधी आंदोलन
यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी देत आंदोलक चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पात उतरले...
सरकारने 4 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या दिव्यांकांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा पूर्ण प्रकल्पात जलसमाधी घेऊ असा इशारा..
कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू हे मोझरी याठिकाणी अन्नत्याग उपोषणावर बसले आहे...
मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे, याचा सर्वाधिक फटका हिंगोली जिल्ह्याला बसला असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे एका रात्रीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात तर 45 मिनिटांमध्ये आलेल्या वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात होत्याचं नव्हतं केलं,
अनेक तरुणांना संधी दिली पाहिजे,मला साहेबांनी सात वर्ष काम करण्याची संधी दिली त्याबद्द्ल आभार
कार्यकर्ते जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहेत
शेवटी पक्ष पवार साहेंबाचा घ्यावा
निर्णय साहेबांनी घ्यायचा आहे.
अनेक काम समाज उपयोग काम केली आहेत
आपल्याला अभिमान वाटला पाहिजे सुप्रिया सुळे देशाच्या महत्वाच्या शिष्टमंडळत काम करत आहेत
सुप्रिया सुळे सात देश जाऊन माहिती घेऊन आल्या
साहेबांनी देशहित सर्वात महत्वाचे कायम धोरण ठेवले आहे
देशाच्या राजकारणात भीष्मपितामह म्हणून संबोधले जाते- जयंत पाटील
पंढरपुरात आज सकाळ पासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.
पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे.
सकाळ पासूनच पावसानं जोर धरल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीररित्या काळे झेंडे दाखवीत लोकप्रतिनिधींच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणणारे तसेच सोशल मीडियाचा माध्यमातून मानहानी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
जालना ते मंठा रोडवर सिंधी काळेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन सुरू...
शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे जालना मंठा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. ...
जालना नांदेड समृद्धीत संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणीसाठी जालन्यातील देवमूर्ती येथे मागील महिन्याभरापासून समृद्धीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
अकोल्यात दुचाकी चोरांच्या टोळीतील तिघांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या.. अकोल्यातील जुने शहर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास करताना चोरी गेलेल्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत... तसेच तीन आरोपींना अटक केली आहे.. मोटारसायकल चोरीला गेल्याच्या तपासादरम्यान, शेख उमर फुरकान अब्दुल सलाम याला पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान, पोलिसांनी शेख उमर यांच्याकडून चोरीच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या. आणि त्याच्या दोन साथीदारांची माहितीही मिळवली ज्यांच्या मदतीने तो आरोपींपैकी तिसऱ्या आरोपीला चोरी करून त्या विकत असे. दरम्यान, अब्दुल अहद आणि शेख अलीम शेख सलीम या दोघांना मोटारसायकल खरेदी प्रकरणी अटक केली आहे.
मुंब्रा दुर्घटनेविरोधात मनसेनं ठाण्यात धडक मोर्चा काढला आहे. रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारत त्यांनी ठाण्यातील गावदेवी मैदातून मोर्चाला सुरूवात केली. या मोर्चाचं नेतृत्व अविनाश जाधव करीत असून, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन.
बालेवाडी स्टेडियममध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यायला सुरुवात.
थोड्याच वेळात बालेवाडीमध्ये होणार ध्वजारोहण.
राष्ट्रवाद चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते १० वाजून १० मिनिटांनी होणार ध्वजारोहण.
अर्धापूर,मुदखेड तालुक्यातील केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान.
वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीन उध्वस्त.
हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल.
अँकर:- नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसाने थैमान घातला आहे. नांदेडच्या अर्धापूर,मुदखेड तालुक्यात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने केळी बागा आडव्या झाल्या आहेत. या सोबतच अनेक घरांवरची पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडाली आहेत. केळी सोबतच फळबागांचा देखील या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण होणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ध्वजारोहण समारंभास उपस्थितीत
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे...
हिंगोलीत रात्री चक्रीवादळाने थैमान घातले आहे कळमनुरी शहरात मुख्य रस्त्यावर या चक्रीवादळाने रस्त्यावर एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे मुख्य मार्गावर हे झाड आडवे झाल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद झाली होती दरम्यान प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने हे झाड बाजूला करत पुन्हा एकदा ही वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती तर अनेक भागात वादळी वाऱ्याने शेतीचे देखील नुकसान झाले आहे
शिधापत्रिका (रेशन कार्ड ) ई केवायसी करण्याची सूचना शासनाने पुरवठा विभागाला केली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील ८२ टक्के इ केवायसी पूर्ण झाली असून अद्याप 3 लाख 20 हजार 634 शिधापत्रिका धारकांची ही प्रक्रिया प्रलंबित आहे. 35 हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आले असून कराड तालुक्याने दोन लाख 92 हजार 925 शिधापत्रिकांची ई-केवायसी करत आघाडी केल्याची स्थिती आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना अनुदानित धान्य आणि इतर अन्नपदार्थ मिळवण्यासाठी शिधापत्रिका केवायसी करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये आधारकार्ड, रेशन कार्डशी जोडणे आणि तपशीलांची पडताळणी करणे हे यामध्ये समाविष्ट केले आहे. फक्त पात्र लाभार्थींकडेच शिधापत्रिका आहेत याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारने शिधापत्रिका ई केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 जून 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.
आषाढी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांना पालखी या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघत असतात त्यानुसार आज पासून त्रंबकेश्वराच्या निवृत्तीनाथ महाराज पालखीचे ही प्रस्थान होत आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ मुंडे ज्ञानेश्वरांचे गुरु बंधू.. तसंच वारकरी संप्रदायाचे संस्थापक त्यामुळे या त्यांच्या समाधी पालखीच्या वारीला आषाढी वारीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ही पालखी निघणार असून 26 दिवसाच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचेल जवळपास 28 दिंड्या यामध्ये सहभागी होणार आहेत
- 7 जूनला 5 फ्लाईट्समधून सर्वाधिक 1334 प्रवाशांनी केला एकाच दिवशी प्रवास
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 40 टक्क्यांनी प्रवाशांची संख्या वाढली
- गेले काही दिवसांपासून विमान प्रवासाला नाशिककर देत आहेत पसंती
- अहमदाबाद, हैदराबाद, गोवा, बंगळुरु दिल्ली, उदयपूर, इंदूर या शहरांसाठी सुरू आहे विमानसेवा
- तसेच जवळपास देशातील 34 वेगवेगळ्या शहरांसाठी नाशिकमधून कनेक्टिंग विमान सेवा देखील सुरू असल्याने नाशिककरांचा विमान प्रवासाला पसंती
धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजप मधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आल्यानंतर आता शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस ही समोर आली आहे. जिल्हाप्रमुख बदलावा अशी मागणी जोर धरतीय.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हा बदल गरज असल्याचे मत शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी व्यक्त केल.जिल्हाप्रमुख बदलला नाही तर पदाधिकारी सामूहिक राजीनामाच्या तयारीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तुळजापूर येथील शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत.
सुशील हगवणे कोथरूड पोलिसांच्या ताब्यात,बनावट कागदपत्रांवर मिळवला शस्त्र परवाना
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी दीर सुशील हगवणे याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.
वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हे मुळशी तालुक्यातील भुकूम येथे वास्तव्यास आहेत.
सुशील, शशांक हगवणे आणि त्यांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण यांनी २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडे अर्ज केला होता.परंतु चौकशीत त्यांनी वास्तव्याचा खोटा पुरावा देत बनावट भाडेकरार सादर केल्याचे उघडकीस आले.
त्यांनी कोथरूड आणि वारजे पोलिस ठाण्यांत सदनिकेचा बनावट पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळवला होता. याप्रकरणी वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
सध्याचा कोरोना चा जो बदल झालेला विषाणू (स्ट्रेन) आहे तो खूपच सौम्य आहे अशी माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) च्या शास्त्रज्ञांनी महापालिकेला दिली आहे.
त्यापासून ज्यांना सहव्याधी आहेत त्यांना काही लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे, ‘एनआयव्ही’ व राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) चे प्रतिनिधी, कोरोना कृतिदल सदस्य उपस्थित होते. यावेळी, ‘एनआयव्ही’ च्या प्रतिनिधींनी सध्याचा विषाणू सौम्य असल्याचे जनुकीय क्रमनिर्धारणाद्वारे समोर आल्याचे सांगितले. यानुसार आयुक्तांनी वयोवृद्ध व सहव्याधी असलेल्या रुग्णांबाबत योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून आरटीओने ही विशेष व्यवस्था पालखीतील वाहनासाठी केली आहे.
वारकरी मोठ्या संख्येने पालखीत सहभागी होताना वाहन घेऊन येतात त्यांच्या वाहनाची सुरक्षितता आणि नियमाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आरटीओने ही मोहीम चालू केली आहे
या वाहनाची तपासणी दिवेघाटामध्ये 9 ते 19 जून पर्यंत सकाळी साडेअकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करता येणार आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्यावर ही जबाबदारी आहे
आळंदी रोड आरटीओ कार्यालयात 9 ते 19 जून पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत प्रादेशिक सहाय्यक परिवहन अधिकारी अमर देसाई यांच्यावर वाहने तपासण्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणार्या भाविकांना जलद आणि सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर आता दर्शन बारीला जाळी गार्ड बसविण्यात आले आहे. यामुळे वारीकाळात दर्शन बारीत होणार्या घुसखोरीला आळा बसणार आहे.
आषाढी यात्रेचा सोहळा तोंडावर आला आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या दररोज एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी पंढरपुरात येत आहेत. त्यामुळे दर्शनाची रांग पत्रशेड पर्यंत गेली आहे. येणार्या भाविकांना जलद गतीने आणि सुलभपणे दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने काही नव्याने उपाय योजना हाती घेतल्या आहेत.
दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवण्यासाठी विणे गल्ली ते पत्राशेड दरम्यानच्या दर्शन बारीला जाळी गार्ड बसविण्यात आले आहेत. साधारण सहा ते सात फूट उंचीचे हे जाळी गार्ड बसवले आहेत. यामुळे दर्शन रांगेतील घुसखोरीला शंभर टक्के आळा बसेल असा दावा मंदिर समितीने केला आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदा मानसूनपूर्व काही प्रमाणात पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद बेण्यांची लागवड पावसाळा सुरू होण्यापूर्वीच केली. मात्र अजूनही मुख्य मान्सूनचा नियमित पाऊस सुरु झालेला नाही. परिणामी हळद पिकाची वाढ थांबू नये म्हणून शेतकऱ्यांना आता स्प्रिंकलरने सिंचन करण्यास सुरुवात केलीये. हळद हे पीक सतत माफक पाण्याची मागणी करते. पाऊस वेळेवर न झाल्यास किंवा खंडित पावसामुळे हळद पिकाचे नुकसान होऊ शकते. हे ओळखून शेतकऱ्यांनी वेळीच सिंचनाची तयारी केली असून, स्प्रिंकलरचा वापर करून पिकांना पाणी दिले जात आहे.
लातूर शहरात मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्याने रौद्ररूप धारण केल्याने,शहरात 10 ते 12 ठिकाणी झाडे पडली ... काही भागात दोन ते अडीच तास तर काही भागात रात्रभर अंधार पडला होता.. औसा रोड, जिल्हा क्रीडा संकुल, पाच नंबर चौक, श्रीनगर, देशपांडे नगर या भागात रात्रभर वीजगुल झाली होती...
वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार पावसाने देखील हजेरी लावली होती... तर लातूर मनपाचे आपत्ती व्यवस्थापन देखील उलमडलेली झाडे आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्रभर प्रयत्न करत होते..
भोकरदन तालुक्यातील करंजगाव येथील तरुण आनंदा कानडे यांनी विविध मागण्यासाठी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पंचायत समिती भोकरदन जिल्हा परिषद कार्यालय जालना आणि जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने अखेर या तरुणाने पंचायत समिती समोर एका झाडावर जाऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन गट विकास अधिकारी, भोकरदन विस्तार अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी, सरपंच करंजगाव यांनी शंकर बाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करंजगाव या नावाने जो निधी काढला त्याची चौकशी करण्याची मागणी या तरुणाने केली आहे. यासह विविध मागण्या तरुणाने केल्या आहेत. मात्र शासनाने त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या तरुणांने झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला...
तुळजाभवानी मंदीर संस्थानला विविध उत्पन्नाच्या बाबींच्या लिलावातून 23 कोटी 52 लाख मिळणार आहेत.विशेष म्हणजे यंदा लिलावात 52 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असुन 8 कोटी 26 लाख 11 हजार रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळणार आहे अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.मंदीरातील विविध उत्पन्नाच्या बाबींचा तीन वर्षासाठी लिलाव करण्यात आला.तुळजाभवानी मंदीरातील वाहीक वस्ञ,होम शाळा,गणेश मंदिर,चिंतामणी यमाई,नंदादीप तेल,शिधा साहित्य, आधारवाडी येथील मंदिर संस्थानचे दोन्ही वाहनतळ आदी विविध सात बाबींची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली मागील काही वर्षांपासून मंदिर संस्थान तीन वर्षासाठी लिलाव करत आहे.या लिलाव प्रक्रियेत मंदिर संस्थांना यापूर्वीच्या लिलावाच्या तुलनेत 8 कोटी 26 लाख 11 हजार रुपये अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे मंदिर संस्थांच्या उत्पन्नात 23 कोटी 52 लाख 44 हजार रुपयांची भर पडली आहे.
नांदेडमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे.या वादळी वाऱ्याने केळीच्या बागा अडव्या झाल्या आहेत. त्या सोबतच फळबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत.त्यामुळे अनेक कुटुंबियांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नुकसान झालेल्या केळीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
- नागपुरात तापमानाचा पारा 44.2 अंशावर पोहचला आहे रवविवारी 43 अंश तापमानाची नोंद असतांना पारा 1.2 अंशांनी वाढला...
- विदर्भात नागपूर सर्वाधिक उष्ण शहर ठरलं, अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे उकाड्यात मोठया प्रमाणात वाढ, सतत वाढत असलेल्या उष्णतेने नागरिक हैराण
- बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा हा 12 जून नंतर मान्सून विदर्भात घेऊन येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे...
- जिथे नागपुरात मे महिन्यात तापमान ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसानं तापमान सरासरी पेक्षा 4 ते 5 अंशाने घटले होते..
- पुढील तीन ते चार दिवस अश्याच पद्धतीने तुरळक पावसासह तापमान राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजी नगर मधील उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात चोरीला गेलेल्या ३२ किलो चांदीपैकी ३०.३४१ किलो चांदी गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. एन्काउंटर झालेला अमोल खोतकर याची बहीण रोहिणी हिची तीन दिवसांपासून चौकशी सुरू होती. या चौकशीत तिने सांगितलेल्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या फोक्सवॅगन कारच्या डिकीत चांदीचे दागिने सापडले. छत्रपती संभाजी नगर शहरातील पडेगाव येथे हिंदुस्थान गॅरेजसमोर काही कार उभ्या होत्या. त्यात अमोलची कारही मागील १० दिवसांपासून उभी असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता गाडीच्या डिकीत लड्डांच्या घरातून चोरीला गेलेले चांदीचे ताट, ग्लास, चमचे, वाट्या, जग असा ३० किलोचा ऐवज सापडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडून पुण्यात आज साजरा करण्यात येणार २६ वा वर्धापन दिन
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सकाळी १० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात पार पडणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन
तर दुपारी तीन वाजता महाळुंगे बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाकडून पुण्यात वर्धापन दिनाचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाला स्वतः शरद पवार, जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि इतर नेते राहणार हजर
तर अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री आणि नेत्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्याला हजेरी
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी
पोलीस अधिकाऱ्यांसह पालखी मार्गावर जात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवस असणार पुण्यात मुक्कामी
याच पालखी मुक्कामी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज
पालखी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी देखील आयुक्तांकडून पाहणी
"तुम्ही तयारीला लागा पुढच्या बैठकीत अधिकचे काय ते ठरवू",.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या शहर पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आदेश
राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची काल बैठक घेतली यात महापालिका निवडणुकीचे प्राथमिक नियोजनाची चर्चा झाली.
दोन्ही ठाकरे एकत्र येणार यावर चर्चा सुरू असताना तुम्ही तयारीला लागा पुढचे काय ते आपण नंतर ठरवू असं राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले.
कामावरून घरी जात असतांना समोरील येणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला अमोरासमोर धडक दिल्याने मोटारसायकल चालक गंभीर जखमीझाल्याची घटना देव्हाडी उड्डाणपुलावर घडली. सदर जखमी मोटारसायकल चालक प्रशांत मधुकर सोनवणे (२८) रा. मुंडीकोटाता. तिरोडा, हा गंभीर जखमी झाला असून त्याला गावकऱ्यांच्या मदतीने तुमसर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या नावाने माणगाव मध्ये CBSC शाळा सुरू झाली आहे. या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री भरत गोगावले, मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. रायगडच्या पालकमंत्री पदावरून एकमेकांची उणीदुणी काढणारे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या निमित्ताने एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले
यवतमाळच्या बाभुळगांव येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या कापूस बियाणावर पोलीस व कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला 400 बियाणे पाकिटांसह चार चाकी वाहन जप्त करून आरोपींवार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले या कारवाईमुळे बोगस बियाणांचा पडदा पास झाला आहे.पोलिस आणि कृषी विभागाच्या पथकांनी बारा लाख 16 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी निघालेली संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूराकडे मार्गस्थ होत आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राजुरच्या घाटात श्री संत मुक्ताबाई च्या पालखीचे दर्शन घेतले व वारकऱ्यांना अभिवादन केले ...
जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताबाई ची पालखी ही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. पालखीचे हे ३१५ वर्ष असून ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत पंढरपूर कडे मार्गस्थ होत आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या पालखीचे आगमन झाल्यानंतर केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पालखीतील वारकऱ्यांना अभिवादन करत श्री संत मुक्ताबाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले तर वारीचे नेतृत्व करत असलेले हरणे महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले वारकऱ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी शिवसेना पदाधिकारी व वारकरी बांधव उपस्थित होते
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनात धावपळ सुरू झाली आहे. आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने पुढील दोन आठवड्यात मार्गदर्शक सूचना काढल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने आता यवतमाळ जिल्हा प्रशासनाला ईव्हीएम आणि स्ट्रॉंग रूमची माहिती मागितली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राची संख्या व इतर माहिती आयोगाला पाठविण्यात आली होती त्यात दोन हजार 578 मतदान केंद्राचा समावेश होता.मात्र आयोगाने सदर माहिती तपावत असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाला पाठविले विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राची यादी तपासून माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जवळ असलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 6 वर असलेल्या शेलोडी गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोर जाणाऱ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने जोरदार धडक दिल्याची घटना पहाटेच्या 4 वाजेच्या दरम्यान घडली आहे. इंदोर येथून हैदराबाद येथे हंस कंपनीची ट्रॅव्हल्स प्रवासी घेऊन जात होती. अशातच खामगाव अकोला नॅशनल हायवे क्रमांक 6 वर शेलोडी गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्स ची धडक ही समोर असलेल्या ट्रकला लागली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये राधेश्याम रामलाल परमार वय 50 रा. बडनगर जिल्हा उज्जैन याचा जागेवरच मृत्यू झाला. तर राजा परमार, बुखार सिंग बच्छाव, दीपक चव्हाण सर्व राहणार बडनगर जिल्हा उज्जैन हे जखमी झाले आहेत. सोबतच ट्रॅव्हल्स मधील अन्य 30 प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच हायवे पोलीस व खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तात्काळ पोलिसांनी ॲम्बुलन्स मध्ये जखमी असलेल्या प्रवाशांना तात्काळ उपचारा साठी खामगाव येथील सामान्य रुग्णाल्यात भरती केले आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते व ज्यांच्या मार्गदर्शनात तब्बल 13 महिने दिल्ली येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्या आंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राकेश टिकेत हे नुकतेच बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुकुंज मोझरी येथे आले होते त्यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीवर पुष्प वाहत दर्शन घेतले. यावेळी राजेश तिकेत यांच्यासोबत प्रहार चे नेते जितू दुधाने व बंटी रामटेके व भारतीय किसान युनियनचे राज्यातील नेते उपस्थित होते. बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांवर सरसकट कर्जमाफी मिळावी व दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावे या मागणी साठी अन्न त्याग आंदोलनला सुरुवात केली आहे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढली आहेत. अतिक्रमणा विरोधात नगरपालिकेने थेट जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली आहे.
अलीकडेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढा असा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, नगरपालिका रोड, पश्चिम द्वार, महाद्वारासह प्रदक्षिणा मार्गावर कारवाई करण्यात आली.
वाशिम नगरपालिका अंतर्गत येणारे कचरा गाडीचे कंत्राटी गाडी चालक, हेल्पर, ट्रॅक्टरचे सफाई कामगारानी आपल्या मागण्यांना घेऊन मागील सहा दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारल आहे, किमान वेतन,पीएफ व एस.आय.सी. लागु करणे,कामगारांच्या पगारात पीएफ मध्ये व एस.आय.सी मध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करणे,मागील एक महिन्याचा पगार त्वरीत करणे व पगार नियमित करणे आणि कामावरुन काढलेल्या सर्व ट्रॅक्टर कामगारांना व इतर कामगारांना विना अट रुजु करणे, कंत्राटदाराची दडपशाही व अत्याचार त्वरीत बंद करणे या मागण्यांना घेऊन कंत्राटी कामगारांनी वाशिमच्या नगरपालिकेसमोर कामबंद आंदोलन पुकारल आहे. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम थांबले आहे. या आंदोलनात कचरा गाडी चालक, हेल्पर, ट्रॅक्टरचे सफाई कामगार असे एकूण 70 कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.