

- सचिन बनसाेडे
Nagar News : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी आज अहमदनगरच्या अकोले शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. आदिवासी नेते अमित भांगरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. (Maharashtra News)
आदिवासींमध्ये समावेश करून धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. तर धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी बांधव आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भव्य मोर्चा काढत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा एल्गार आदिवासींनी केला. यासह पेसा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, कंत्राटी भरती रद्द करावी इत्यादी मागण्या देखील या मोर्चाच्या (morcha) माध्यमातून करण्यात आल्या.
या माेर्चात महाविकास आघाडीचे अनेक नेते, कार्यकर्ते, शेकडो आदिवासी महिलांसह पुरूष माेठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलीसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.