आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हाट्सअप संदेश; सिरम इन्स्टिट्यूटची १ कोटींची फसवणूक

बनावट व्हाट्सअॅप खाते बनवत सिरम इन्स्टिट्यूटला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Adar Poonawalla
Adar Poonawallasaam tv

सचिन जाधव

Adar Poonawalla News : प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप खाते बनवून संदेश पाठवणे आणि पैसे मागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बनावट व्हाट्सअॅप खाते बनवून गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. चक्क सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्या नावाने बनावट व्हॉटसअ‍ॅप बनवून संदेश पाठवण्याचा प्रकार घडला आहे. बनावट व्हाट्सअॅप खाते बनवत सिरम इन्स्टिट्यूटला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Adar Poonawalla
चोरट्यांपासून सावधान, दोन वर्षात ११४६ मोबाईल लंपास, सायबर सेलने केली धडक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसअ‍ॅप बनवून थेट सिरम इन्स्टिट्यूटला गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. सदर प्रकार ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला आहे. या प्रकरणी सिरम इन्सिट्यूटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तुर (वय ४४, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Adar Poonawalla
कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची मोठी कारवाई! ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कित्तुर हे सिरम इन्स्टिट्युटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत, तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आदर पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटसअ‍ॅप संदेश देशपांडे यांना आले. त्यामुळे ते संदेश सतीश देशपांडे यांना खरे भासले.

संदेशात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलीसांकडे तक्रार देण्यात आली. याचा तपास बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com