सुमित सावंत
मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) कोरोनाचा प्रसार कमी होताच १ ली ते ७ वी च्या शाळा (Schools) काही निर्बंधांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू होताच बहुतेक शाळांचे ऑनलाईन शिक्षण (Online Teaching) बंद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत शाळांना कडक शब्दात सूचना दिल्या जाणार आहेत.
हे देखील पहा-
त्यानंतरही ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देणार नाहीत त्यांच्यावर राज्य सरकारच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईमधील १ ली ते ७ वी च्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करताना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पाठवण्यास तयार नसतील त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत.
मात्र, १५ डिसेंबरपासून शाळा सुरू होताच मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. यामुळे कोरोना आणि ओमिक्रॉन विषाणू (Omicron Variant) प्रसाराच्या भीतीने जे विद्यार्थी शाळेत जाणार नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मुलांना शाळेत पाठवले तर विषाणूच्या संसर्गाची भीती, आणि जर शाळेत नाही पाठवले तर शैक्षणिक नुकसान होणार अशी भीती सध्या पालकांमध्ये आहे.
ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देत नाहीत त्यांची तक्रार आल्यास त्यांच्यावर राज्य सरकारच्या नियमानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी (Raju Tadvi) यांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.