पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांची EDकडून चौकशी ! (पहा Video)

पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame ) यांची काल ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली आहे.
पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांची EDकडून चौकशी ! (पहा Video)
पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांची EDकडून चौकशी ! (पहा Video)अश्विनी जाधव केदारी
Published On

अश्विनी जाधव केदारी

पुणे - पुण्याचे वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame ) यांची काल ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणामध्ये (Anil Deshmukh) श्रीरामे यांनी ईडी कार्यालयात (ED Office) जवाब नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख गृहमंत्री असताना करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात राहुल श्रीरामे यांचा जबाब नोंदवला गेला आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार (Transfer Corruption) झाला होता. तसेच पैसे घेऊन अनेक पोलिसांना पोस्टिंग दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राहुल श्रीरामे यांच्यासमवेत या प्रकरणात आणखी ही काही अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जातं आहे.

पहा व्हिडीओ-

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ( IAS Sitaram Kunte ) यांची देखील याआधी चौकशी झालेली आहे. पैसे घेऊन पोलिसांच्या बदल्या केल्या होत्या आणि त्या संदर्भांत राज्याच्या गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मि शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अहवाल तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना दिला होता, तर गृहविभागाचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य सचिव सीतीराम कुंटे यांच्या हाती अहवाल सुबोध जयस्वाल यांनी दिला होता. त्यानंतर सरकारने त्या अहवालावर काहीही कारवाई केली नाही असा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com