मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपींला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक
मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटकसुरज सावंत

सुरज सावंत

बारामती : मुंबईत Mumbai बोगस लसीकरण vaccination करणाऱ्या आरोपीला बारामतीतून Baramati अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपींला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रात्री बारामती- भिगवण Bhigwan रोडवरील अमृता लॉज मधून अटक करण्यात आली आहे. Accused in Mumbai vaccination case arrested from Baramati

या संदर्भात पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुंबई येथील गुन्हयातील पाहिजे असलेला, आरोपी राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे हा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये hospital बिझनेस डेव्हलपमेंट Business development मॅनेजर म्हणुन नोकरीस होता. त्याने व त्याचे साथीदारांनी मिळुन भेसळ युक्‍त द्रव कोविड Covid १९ ची लस असल्याचे, भासवुन लोकांचा कॅम्प आयोजित केला होता.

हे देखील पहा-

सिल तुटलेल्या व्हॅक्सीनच्या बाटल्यामध्ये लस देेत अनेकांची फसवणुक केली आहे. लसीकरण केलेल्या लोकांना मुंबई मधील वेगवेगळया नामांकित हॉस्पिटलचे लसीकरण केल्याचे, प्रमाणपत्र Certificate देवुन त्यांची फसवणुक केलेली आहे. त्यामुळे आरोपी पांडे अटक चुकविण्यासाठी, पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे Pune शहर व परिसरात आल्याची माहिती कांदिवली Kandivali पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी दिली. Accused in Mumbai vaccination case arrested from Baramati

मुंबई बोगस लसीकरण प्रकरणातील आरोपीला बारामतीतून अटक
धक्कादायक : लसीकरण केंद्राच्या नावाखाली मुंबईत काळाबाजार

यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्वत: पथक तयार केले आहे. आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा शहरातील अमृता लॉज या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी हा चाणाक्ष, हुशार व उच्च शिक्षित असल्याने, त्यास ताब्यात घेण्यासाठी यावेळी पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, व अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे, सहा पोलीस निरिक्षक मुकुंद पालवे,पोलीस अंमलदार नवनाथ शेंडगे व सचिन कोकणे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com