
Mumbai Aarey Accident : मुंबईच्या आरे कॉलनी परिसरामध्ये काल रात्री भीषण अपघाताची घटना घडली. ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकला ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये बाईकवरील दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. बेजबाबदारपणे बाईक चालवल्याने हा अपघात घडल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हा अपघात रात्री १०.३० च्या सुमारास घडला आहे.
आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंटजवळ काल रात्री (५ जानेवारी) अपघात झाला. ट्रकची धडक झाल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. दोन्ही मृत तरुण आरे कॉलनीमध्येच रहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान आरे कॉलनी पिकनिक पॉईंटजवळच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक बाईक वेगाने रस्त्यावरुन धावत असल्याचे दिसते. ती बाईक चालवणारा तरुण भर रस्त्यात स्टंट करताना दिसतो. पुढे तो बाईकचा वेग वाढवतो. बाईक चालवताना चुकीच्या लेनमध्येही घुसतो. त्या बाईकसमोर एक बस असते. बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात ती बाईक विरुद्ध लेनमध्ये जाते. त्याचवेळी समोरुन मोठा ट्रक येतो. हा ट्रकची अचानक समोर आलेल्या बाईकला टक्कर होते. ट्रक बाईक आणि त्यावर बसलेल्या दोघांना चिरडतो, असे व्हिडीओत दिसते.
या व्हिडीओमधील तरुणांनी बाईक चालवताना हेल्मेट घालतं नाही. ते रहदारीच्या रस्त्यावरुन गरजेपेक्षा जास्त वेगाने बाईक चालवत होते. त्याशिवाय त्यांनी बाईक विरुद्ध लेनमधून देखील चालवली. अशा प्रकारे कायद्याचे पालन न करता बेजबाबदारपणे बाईक चालवल्याने तरुणांना जीव गमवावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.