BMC Budget 2022-23: मुंबईचा शाश्वत विकास करणारा अर्थसंकल्प - आदित्य ठाकरे

मुंबई महानगर पालिकेचा अ आणि ब चा यंदाचा अर्थसंकल्प (BMC Budget 2022-23) सादर झाला.
BMC Budget
BMC Budget Saam Tv
Published On

मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा (Brihanmumbai Municipal Corporation) अ आणि ब चा यंदाचा अर्थसंकल्प (BMC Budget 2022-23) सादर झाला. हा अर्थसंकल्प प्रगतशील, संवेदनशील राज्याच्या राजधानीचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीये (Aaditya Thackeray Says This BMC's budget is for the sustainable development of Mumbai).

BMC Budget
BMC Budget 2022-23: पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प; ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा बजेट सादर

"प्रगतशील, संवेदनशील राज्याचे राजधानीचा हा अर्थसंकल्प (BMC Budget) आहे. महिलांसाठी खूप महत्वाच्या गोष्टी यात आहेत. ग्रीन फायनान्स आहे, पर्यावरणासाठी आहे. 'पुढे चला मुंबई' हा नारा घेऊन पुढे जायचे आहे. मुंबईचे मुख्यमंत्री असल्याने मुंबईसाठी चांगल्या गोष्टी झाल्या आहेत. त्या अर्थसंकल्पात दिसत आहेत", असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सांगितलं.

"मुंबईचा (Mumbai) शाश्वत विकास करणारा अर्थसंकल्प आहे, मुंबईचे सर्व पैलू या अर्थसंकल्पामध्ये घेतले गेले आहेत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून नैराश्य दिसलं तसा हा अर्थसंकल्प नाही. हा अर्थसंकल्प प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून, मुंबईच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेला आहे", असंही त्यांनी सांगितलं.

BMC Budget
Sharad Pawar statement on Budget : अर्थसंकल्पामध्ये सामान्यांची निराशा - शरद पवार

"25 हजार विद्यार्थी वाढले आहेत. मोफत शिक्षणासाठी बोर्ड आणत आहोत. त्याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे, प्रतिसाद चांगला मिळाला आहे. शिक्षणासाठी जसा फंड वापरला जाईल, तसा तो वाढवला जाईल. विजनरी गोष्टींवर विरोधक टीका करतात कारण तसं व्हिजन त्यांच्याकडे नाही. डीसायलेशनचा प्रोजेक्ट महत्वाचा आहे, कमी वेळात, कमी किंमतीत, जंगल वाचवून यामधून पाणी येणार आहे", असंही ते म्हणाले.

"विरोधक टीका करणारच. लोकांचा ठामपणे विश्वास मगाविकास आघाडीवर आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. विरोधी पक्षांचे फ्रस्ट्रेशन वाढत चालले आहे. ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आरोपांमध्ये दिसत आहे", असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com