मुंबई: मुंबई महानगर पालिकेचा (Brihanmumbai Municipal Corporation) अ आणि ब चा यंदाचा अर्थसंकल्प (BMC Budget 2022-23) सादर झाला हा इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला आहे. बीएमसीचा (BMC) यंदाचा अर्थसंकल्प हा सुमारे ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.७०% टक्क्यांनी या अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. मात्र असं असलं तरी मालमत्ता करापासून (Property Tax) मिळणार उत्पन्न घटलयं. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प वाढला असला, तरी तिजोरीला गळती लागली आहे. मालमत्ता करात ७ हजार कोटीवरून ३ हजार ९५० कोटींवर आल्याने मोठी घट दर्शविण्यात आली आहे. ७ हजार कोटी मिळणारं अंदाजित उत्पन्न ४८०० कोटी इतकं करण्यात आलं आहे. (The largest budget in the history of mumbai municipality; 45 thousand 949 crore budget presented)
हे देखील पहा -
५०० चौ. फुटांखासील घरांना मालमत्ता करातून १०० % सूट मिळालेल्या नागरिकांची संख्या 16,14,000 इतकी असून सवलतीची रक्कम ४६२ कोटी आहे, तर कोस्टल रोडसाठी (Coastal Roam) यंदाही भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी ३५०० कोटींची तरतूद केली होती तर यंदाही ३२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यासाठी १३०० कोटींची तरतूद, मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमासाठी ८०० कोटी तर व्हॉट्सॲप चटॅबॉट्ससाठी ७८ कोटींची तरतूद आहे.
बीएमसीच्या २०२२-२३ निवडणूकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या `वापरकर्ता शुल्काची´ घोषणा करण्यात आली आहे. कचरा निर्मीती करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावा लागणार आहे. वर्षाला वापरकर्ता शुल्कातून १७४ कोटींच्या उत्पन्नाचे पालिकेचे लक्ष्य आहे. मुंबईतील ३५०० उपहारगृहांनाही आता कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. या सर्व उपहारगृहातून येणाऱ्या ३०० टन ओल्या कचऱ्यावर महापालिकेला २६ कोटींचं वापरकर्ता शुल्क मिळणार आहे.
त्याचप्रमाणे ईज ॲाफ डुईंग बिजनेसमन व्यवसाय विकासाठी १० कोटी, मुंबई पुरमुक्त आणि पर्जन्य जल उदंजनासाठी ५२६ कोटींची तरतुद, मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद, मुंबईतील नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दहिसर, पोईसर, ओशिवरा, आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवनासाठी हा निधी आहे.
तिजोरीला लागलेली गळती पहाता, महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी पालिकेने नवे मार्ग शोधले आहेत. यानुसार अनधिकृत बांधकामावर ज्यादा दंड आकारणी होणार आहे. अनधिकृत बांधकाम आढळल्यास मालमत्ता कराच्या दोन पट दंड आकारणी होणार. उत्पन्नवाढीसाठी मुंबईत डिजीटल जाहिरातींच्या माध्यमांना परवानगी दिली जाईल, यातून अतिरीक्त उत्पन्न कमावले जाईल.
मुंबईच्या आरोग्यावरहा 2660 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिव योग केंद्र आता मुंबईत असणार, केंद्राच्या योजनेचं मुंबईत सेनेकडून नवीन नामकरण करण्यात आलं आहे. अशी 200 केंद्र स्थापन केली जाणार असून त्यासाठी 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेची मोठी थकबाकी येणे बाकी आहे. यात सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी शासनाच्या विविध कार्यालयांकडून ६७६८.१६ कोटी येणे बाकी तर शिक्षण खात्याकडूनही सहाय्यक अनुदानापोटी ४८४०.६१ कोटी मुंबई महापालिकेला येणे बाकी आहे.
राणीबागेच्या विस्तारीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ११५ कोटी खर्च केले जाणार आहेत. मुंबईतील कोविड संकट काळातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही मोठा खर्च केला जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतीसाद व्यवस्थापनाकडून २७६४.८८ कोटींची मागणी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपल्या घराशेजारी आरोग्य केंद्र असणार त्यासाठी मुंबईत २०० हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार त्यासाठी एकूण ४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या नवीन प्रकल्पांकरीता ३६५ कोटींचा निधी तर महापालिकेच्या मांड्याकरता १२१ कोटींच्या निधी तरतुद केली आहे.
पर्यावरण खात्याच्या एक भाग म्हणून हवामान कृती कक्षाची निर्मिती करण्याकरिता 1 कोटींची तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यावर सुयोग्य तंत्रज्ञान वापर करून जमीन पुनर्प्राप्ती करणे, कचऱ्याचे संकलन याकरिता १६७.८७ कोटी तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईतील महत्वाचे मोठे प्रकल्प जसे कोस्टल रोड, जीएमएलआर, एसटीपी अश्या प्रकल्पांकरता भांडवली खर्चात मोठी वाढ दर्शवण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भांडवली खर्चात ५६% वाढ म्हणजे 22646.73 कोटींचा भांडवली खर्च दर्शवला आहे. हा भांडवली खर्च भागवण्यासाठी ४९९८ कोटी इतका निधी अंतर्गत कर्जाद्वारे उभारला जाणार आहे. गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रिडा केंद्रावर 268 कोटी खर्च करून मराठी नाट्य विश्व संग्रहालय पालिका उभारणार आहे, सध्याच्या बजेटमध्ये या प्रकल्पासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडे पाणी मिळणार आहे, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतुद करण्यात आली असून मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता २०० कोटींची तरतुद केली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खाऱ्यापाण्यातून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे मध्यवैतरणा तलावावर २० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
- ८० मेगावॅट क्षमतेचा तरंगत्या सौरउर्जा प्रकल्पासाठी 10.30 कोटींची तरतुद
- जलवहन बोगद्यांसाठी ४६७ कोटींची तरतुद
- मुंबई पुरमुक्त आणि पर्जन्य जल उदंजन ५२६ कोटी तरतुद
- मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी भरीव तरतूद १५७६ कोटी
- मुंबईतील नद्या्चे पुनरूज्जीवन २०० कोटींची तरतुद
- दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवन
- मुंबईतील रस्ते सुधारण्याकरीता २२०० कोटी खर्च केले जाणार
- मुंबईतील ४७ पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या, १४४ पुलांच्या किरकोळ दुरुस्त्यांच्या कामासाठी 1576.66 कोटींची तरतुद
- मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी (एसटीपी) २०७२ कोटींची तरतुद
- मुंबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता ७६५ कोटींची भरीव तरतुद
- मिठी नदी पुनरुज्जीवन आणि पूरनियंत्रणाकरता 565 कोटींची तरतुद
- मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी (एसटीपी) - २०७२ कोटींची तरतुद, यापैकी ७ एसटीपी प्रकल्पांसाठी १३४० कोटींची तरतुद
- मुंबईत भारतातील पहिले विशेष मुलांकरता केंद्र, (Early intervention & Rehabilitation centre) यासाठी १४ कोटींची तरतुद
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर `सर्वांसाठी पाणी´ हे महापालिकेचे नवे धोरण
याआधी सत्ताधारी शिवसेनेनं 24 तास पाणी मुंबईकरांना देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याचा केवळ प्रायोगिक प्रकल्प मुलुंड, वांद्रे पश्चिममध्ये सुरु करण्यात आला नंतर तो बंद पडला. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा व्यवस्थेवर भरीव तरतुद करण्यात आली आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता २०० कोटींची तरतुद करण्यात आली असून या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खाऱ्यापाण्यातून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.