Kalyan Politics: श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा दौरा; कल्याणमधील बॅनर्सनी राजकीय वातावरण तापलं

Aaditya Thackeray Banner In Kalyan: आदित्य ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये बॅनर झळकले आहेत.
Aaditya Thackeray Kalyan Visit
Aaditya Thackeray Kalyan VisitSaam Tv
Published On

Aaditya Thackeray Kalyan Visit

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Banner) आज कल्याण पूर्व मतदार संघात येणार आहेत. कल्याण पूर्वे कोळशेवाडी येथील शाखेला भेट देऊन या शाखेतच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा बालेकिल्ला आहे. (maharashtra politics)

कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. त्यापाठोपाठ संजय राऊत व आज आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे, त्यामुळं ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघावर (Lok Sabha Election 2024) विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये बॅनर झळकले आहेत. या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॅनर ठरला चर्चेचा विषय

आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण कोळशेवाडी शहर शाखेतर्फे कल्याण पूर्व परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शाखेजवळ लावण्यात आलेला 'कल्याण लोकसभा नगरीत अजिंक्यतारा चमकणार' हा बॅनर चर्चेचा विषय ठरला (Aaditya Thackeray Kalyan Visit) आहे. या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.

आदित्य ठाकरे कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली (Aaditya Thackeray Banner In Kalyan) होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. काही दिवसात पूर्वीच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना घडली होती.

Aaditya Thackeray Kalyan Visit
Satara Lok sabha Constituency : उदयनराजे भाेसले- जयकुमार गाेरेंच्या मैत्रीत लाेकसभा निवडणुक ठरणार मिठाचा खडा? चर्चांना उधाण

मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वमध्ये देखील मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली (Kalyan News) आहे.

या सर्वच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) काय बोलणार, कुणावर टीका करणार, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Aaditya Thackeray Kalyan Visit
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीआधी देशात मोठी उलथापालथ! 15 माजी आमदार आणि खासदारांनी केला भाजपमध्ये प्रेवश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com