

अभिजीत देशमुख
Dombivli News : दुचाकीवरून आलेल्या दोन खोडसाळ तरुणांनी रिक्षाचालकाला टपली मारली. रिक्षाचालकाने या खोडसाळ तरुणांना जाब विचारला असता संतापलेल्या तरुणांनी रिक्षा चालकावर चाकूने प्राण घातक हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत परिसरात घडली. हा सर्व थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Latest Marathi News)
या प्रकरणी रामनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या सहाय्याने हल्लेखोर तरुणांचा शोध रामनगर पोलीस सुरु केला आहे. रिक्षाचालक सिताराम शेवाळे काल सकाळच्या सुमारास डोंबिवली (Dombivli) पूर्वेतील स्टेशन जवळील इंदिरा चौकात आले होते. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तींनी रिक्षा चालकास डोक्यात टपली मारून पुढे गेले यांचा जाब चालक सिताराम यांनी विचारला.
त्यानंतर या खोडसाळ तरुणांनी सिताराम यांना मारहाण केली आणि हातावर चाकूने हल्ला केला आहे. यात सिताराम हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने हल्लेखोर तरुणांचा शोध रामनगर पोलिसांनी सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.