Pune News: चहाची तलफ तरुणाच्या जीवावर बेतली; घोट घेताच काही क्षणात गेला जीव; पुण्यातील घटनेने हळहळ

Pune News: ही दुर्देवी घटना पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
A 32-year-old man died after a tree branch fell on his head in pune
A 32-year-old man died after a tree branch fell on his head in puneSaam TV
Published On

Pune Marathi News

झाडाखाली चहा पीत उभ्या असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अचानक झाडाची फांदी कोसळली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. अभिजित गुंड (३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

A 32-year-old man died after a tree branch fell on his head in pune
IMD Rain Alert: राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; पुढील ३-४ तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित गुंड हा तरुण रविवारी सायंकाळी चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आला होता. चहा घेताना तो मित्रांसोबत निवांत गप्पा मारत होता.

त्यावेळीच झाडावरून अचानक वाळलेली फांदी कोसळली. ही फांदी अभिजित याच्या डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

दरम्यान, अभिजितच्या मृत्यूला विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे तसेच गार्डन विभागाचे अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप अभिजितच्या मित्रांनी केला आहे. सर्व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा करण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

A 32-year-old man died after a tree branch fell on his head in pune
Pune News: पुणे-नगर महामार्गावर गॅस टँकरचा अपघात; मोठ्या प्रमाणात वायूगळती, धडकी भरवणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com