Mumbai Crime : 15 वर्षांच्या शाळकरी मुलाने केला विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Crime News
Crime Newssaam tv
Published On

संजय गडदे

Mumbai Crime : मुंबईच्या (Mumbai) कांदिवली पश्चिमेकडिल एका खासगी शाळेत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थ्याला चाकूने जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेचा परिसरातील नागरिकांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल (Video Viral) होतात पोलिसांनी त्या विद्यार्थ्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला आहे.

Crime News
Sanjay Raut : तुम्हाला जर उत्तम शिव्या देता येत असतील तर.., संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक सल्ला

कांदिवली पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत 26 नोव्हेंबर रोजी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीच्या एका भांडणावरून वाद झाला यातील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करून जखमी केले. या घटनेचा व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर चित्रीत केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला जवळील ट्रायडंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यामुळे विद्यार्थ्याला 19 टाके पडले होते उपचारानंतर बुधवारी त्या विद्यार्थ्याला डिस्चार्ज देण्यात आला.

व्हिडिओची दखल घेऊन, कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. आरोपी फरार असून कांदिवली पोलीस आरोपी मुलाचा शोध घेत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि आरोपी कांदिवली पश्चिमेकडील एका शाळेत वेगवेगळ्या विभागात शिकतात. तपासादरम्यान असे समजले की, घटनेच्या काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये एका मुद्द्यावरून भांडण झाले होते. यातूनच आरोपीने रागाच्या भरात त्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

व्हिडिओमध्ये डझनभर विद्यार्थी आणि स्थानिक हा हल्ला पाहताना दिसत आहेत. पीडित विद्यार्थ्याला स्कूटरवर बसवलेले असताना आरोपीने चाकू काढला आणि त्वरीत चाकूने हल्ला केला. ज्यामुळे त्याचा तोल गेला. त्यानंतर आरोपी मुलगा काही विद्यार्थ्यांसोबत पळताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com