Diva Crime : ७ आणि ९ वर्षीय सख्ख्या बहिणींवर ६० वर्षीय नराधमाचे अत्याचार, अश्लिल व्हिडिओ दाखवून भयंकर कृत्य

Thane Crime News: ठाण्यातील दिवा पूर्व येथील ओंकार नगर परिसरात एका ६० वर्षीय विकृतानं ९ वर्षीय आणि ७ वर्षीय सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केले.
Thane Crime News
Thane Crime NewsSaam TV

कल्पेश गोरडे

Thane Crime News : ठाण्यातील दिवा पूर्वेकडील ओंकार नगर परिसरातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय विकृत वृद्धाने ९ आणि ७ वर्षीय सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विकृत नराधमाला तात्काळ अटक केली आहे. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील (Thane) दिवा पूर्व येथील ओंकार नगर परिसरात ही घटना घडली. एका ६० वर्षीय विकृतानं ९ वर्षीय आणि ७ वर्षीय सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

Thane Crime News
Nashik Crime News : नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत; बहिणीला का छेडलं? भावानं जाब विचारल्याने दोघांवरही हल्ला

संशयित आरोपी ६० वर्षीय व्यक्ती ही पीडित मुलींच्या शेजारी राहते. या ६० वर्षीय नराधमाने या दोघी बहिणींना खाऊ देण्याचे आमिष दाखवत आपल्या घरी अभ्यासाला बोलावले. याच संधीचा गैरफायदा घेत या नराधमाने ९ वर्षीय चिमुकलीला अश्लिल व्हिडिओ (Obscene Videos) दाखवून लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली.

Thane Crime News
Thane News: स्थानिक गुंडाच्या धमकीने तरुण घाबरला, उचललं टोकाचं पाऊल; ठाण्यातील धक्कादायक घटना

हा विकृत नराधम एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चिमुकलीला व्हिडिओमधील दृश्य दाखवून तशीच कृती करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या ७ वर्षीय चिमुकल्या बहिणीशीही अश्लिल चाळे केले. आपल्यासोबत वारंवार घडत असलेला प्रकार मुलींनी आईला सांगितला. त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी मुलींच्या आईने मुंब्रा पोलीस (Mumbra Police) ठाण्यात आरोपी वृद्धाविरोधात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या विकृत नराधमाविरुद्ध अल्पवयीन तथा बालकांसोबत लैंगिक अत्याचार, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com