Shocking News : मुलाच्या लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच आईचं निधन; पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pune News : पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांवर मुलाचं लग्न ठरलेलं असताना या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Shocking News : मुलाच्या लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच आईचं निधन; पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Pune NewsSaam Tv
Published On
Summary

पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झाला

मृत महिलेचं नाव आशा संजय गवळी असून त्या ५२ वर्षांच्या होत्या

काही दिवसांवर त्यांच्या मुलाचं लग्न होतं

अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला

पुण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील पिंपरी चिंचवड भागात पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कदायक म्हणजे काही दिवसांवर या महिलेच्या मुलाचं लग्न येऊन ठेपलं होत. मात्र महिलेच्या जाण्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत महिलेचं नाव आशा संजय गवळी (वर्षे ५२) असं आहे. या घटनेने परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये रहिवाशी असलेल्या आशा संजय गवळी या आज सकाळी पिण्याचं पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या दरम्यान त्यांचा तोल जाऊन त्या पाण्याच्या टाकीत पडल्या. या दुर्घटनेत आशा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आशा यांच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

Shocking News : मुलाच्या लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच आईचं निधन; पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Cyclone Alert : मोंथा चक्रीवादळ निवळलं? राज्यात पावसाचा जोर कायम, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

अग्निशमन दलाने माहिती मिळाल्याक्षणी तातडीने धाव घेत आशा यांचं घर गाठलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने आशा गवळी यांचा मृतदेह पाण्याच्या टाकी बाहेर काढून शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह वाय सी एम हॉस्पिटल मध्ये पाठवला आहे. आशा यांच्या घरी मुलाची लगीन घाई सुरु होती.

Shocking News : मुलाच्या लग्नाच्या चार दिवसांपूर्वीच आईचं निधन; पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Crime News : पोलिसांचा धाक उरला नाही? छठ पूजेदरम्यान दोन गटात तुंबळ हाणामारी, नेमकं काय घडलं? video viral

येत्या ४ नोव्हेंबरला आशा यांच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र वरमाई म्हणून मिरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आशा यांच्या अपघाती निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आईच्या जाण्याने मुलाचं मन हादरलं आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com