Sahyadri Express: सह्याद्री एक्सप्रेससह 5 एक्सप्रेस कायमच्या रद्द

सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
Sahyadri Express
Sahyadri ExpressSaam Tv

मुंबई: भारतीय (Indian) रेल्वेच्या (railways) नवीन धोरणानुसार, प्रवाशांचा (passengers) प्रतिसाद कमी असल्यामुळे कोल्हापूर (Kolhapur)- मुंबई- सह्याद्री एक्स्प्रेसबरोबर (Sahyadri Express) कोल्हापूर- मनगुरू, कोल्हापूर- बिदर, कोल्हापूर- सोलापूर (Solapur), मिरज- हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज- पंढरपूर (Pandharpur) सुपरफास्ट या एक्स्प्रेस (Express) कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. (5 Express with Sahyadri Express canceled permanently)

हे देखील पहा-

कोल्हापूर- पुणे, मिरज-हुबळी, मिरज- परळी, मिरज- कॅसलरॉक या ५ पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस म्हणून आता रेल्वे रुळावर धावणार आहेत. रेल्वेच्या निघालेल्या नवीन धोरणानुसार, केवळ हंगामामध्ये फुल्ल, तर इतरवेळेस तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस आणि पॅसेंजर (Passenger) रद्द करण्यात आले आहेत. याविषयी रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड (Covid) साथीने मार्च २०२० पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या परत सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sahyadri Express
Sindhudurg Accident: जानवलीजवळ इनोव्हा कार आणि लक्झरीमध्ये भीषण अपघात, ९ जखमी

यापुढे फक्त आता १५० किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. १५० कि.मी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होत आहे. यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज- हुबळी पॅसेंजर, मिरज- परळी पॅसेंजर, मिरज- कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com