पती घरात नसताना 25 वर्षीय महिलेनं उचललं टोकाच पाऊल...

मृत महिलेस अडीच वर्षाचा लहान मुलगा देखील आहे. सोनार कुंटुंबीय हे महाराजा कॉम्प्लेक्समध्ये काही महिन्यांपूर्वीच राहण्यासाठी आले होते.
पती घरात नसताना 25 वर्षीय महिलेनं उचललं टोकाच पाऊल...
पती घरात नसताना 25 वर्षीय महिलेनं उचललं टोकाच पाऊल...चेतन इंगळे
Published On

मुंबई : विरार पूर्वेकडील एका इमारतीत 25 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. विरारच्या महाराजा कॉम्प्लेक्समधील बी विंग 304 या घरामधे स्वाती सोनार वय वर्ष 25 या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती रिशी सोनार वय वर्ष 31 हा सकाळी कामावर गेला असता त्याच्या बायकोने गळफास घेतला असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

हे देखील पहा -

मृत महिलेस अडीच वर्षाचा लहान मुलगा देखील आहे. हे दोघे महाराजा कॉम्प्लेक्समध्ये (Maharaja Complex) काही महिन्यांपूर्वीच राहण्यासाठी आले होते. अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. घटनास्थळी विरार पोलीस (Virar police) दाखल झाले असून मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com