Pune Accident News : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच; देवदर्शनाला निघालेल्या भाविकांची पिकअप उलटली, १७ जखमी

Pune Road Accident News : पुण्यात नवले पुलावरील भीषण अपघातानंतर भिमाशंकरला जाणाऱ्या भाविकांची पिकअप पोखरी घाटाजवळ उलटली. या अपघातात १७ जण जखमी तर ३ जण गंभीर झाले असून उपचार मंचर येथे सुरू आहेत.
Pune Accident News : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच; देवदर्शनाला निघालेल्या भाविकांची पिकअप उलटली, १७ जखमी
Pune NewsSaam Tv
Published On
Summary

पुण्यात नवले पुलानंतर भिमाशंकर रस्त्यावर आणखी एक मोठा अपघात

भाविकांना घेऊन जाणारी पिकअप पोखरी घाटाजवळ उलटली

१७ जण जखमी तर ३ गंभीर जखमी

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला

पुण्यात काळ संध्याकाळी नवले पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनरला आग लागली. या दुर्दैवी घटनेत एकूण ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेनंतर पुण्यात आणखी एक भीषण अपघाताचा थरार पाहायला मिळाला आहे. आळंदीहुन भिमाशंकरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची पिकअप गाडी उलटली. दुचाकीस्वाराने भाविकांच्या गाडीला कट मारल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत एकूण १७ जण जखमी झाले असून त्यातील ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव ते श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्यावर असणाऱ्या पोखरी घाटाजवळ गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मंठा (जालना) येथील भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन अपघातग्रस्त झाले. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन उलटल्याची माहिती मिळाली. अपघातानंतर घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Pune Accident News : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच; देवदर्शनाला निघालेल्या भाविकांची पिकअप उलटली, १७ जखमी
Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

या अपघातात एकूण १७ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे आणण्यात आले. त्यापैकी १४ जणांना किरकोळ दुखापती तर ३ जणांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. जखमींमध्ये शंकर ठाकरे (वर्षे २२), पंचकुला दरडे (वर्षे ६५), जनाबाई गोटे (वर्षे ५०), लीलावती मोटे (वर्षे ६५), शशिकला वायाळ (वर्षे ५५), वर्षा काळे (वर्षे २४), श्रावणी काळे (वर्षे ५), सुवर्णा (वर्षे ३७), पृत्वीराज वायाळ (वर्षे १४), पार्वती वरकड (वर्षे ६५), महादेवी वारकड (वर्षे ६५), इंदूबाई (वर्षे ५५), सविता जाधव (वर्षे ३९), ईश्वरी बोरकर (वर्षे १०), गोदावरी शेंगडे (वर्षे ७५), ऊर्मिला धाणेकर (वर्षे ३८) आणि शोभा चव्हाण (वर्षे ३०) यांचा समावेश आहे.

Pune Accident News : पुण्यात अपघाताचे सत्र सुरूच; देवदर्शनाला निघालेल्या भाविकांची पिकअप उलटली, १७ जखमी
Shocking : महिला असल्याचं भासवून तरुणाशी चॅटिंग, मारहाण करून लुटले; मनसे तालुकाध्यक्षासह युट्युबर, तडीपार गुंडाचा प्रताप

तसेच गंभीर जखमींमध्ये गणेश मोरे (वर्षे६५), शशिकला वायाळ (वर्षे५५) आणि एक अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचार सुरु असून डॉ. प्रिया पडोळे, डॉ. कुलदिप कठाळे, डॉ. साहिल टाके, डॉ. स्नेहल बोंबले आणि डॉ. विवेकानंद फसाले यांच्या पथकाने उपचार सुरु केले आहेत. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दरम्यान लागोपाठ घडलेल्या या अपघाताच्या घटना भीषण असून रस्ते अपघाताचं प्रमाण राज्यात वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com