पतंग उडवताना तोल गेला, इमारतीच्या डक्टमध्ये पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

12 year old boy dies while flying kite In Pune:पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे पतंग उडवताना तोल जाऊन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या डक्टमध्ये पडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Police and locals gather at the under-construction building in Ambegaon Khurd, Pune, where a 12-year-old boy lost his life after falling into a duct.
Police and locals gather at the under-construction building in Ambegaon Khurd, Pune, where a 12-year-old boy lost his life after falling into a duct.Saam Tv
Published On
Summary

पुण्यातील आंबेगाव खुर्द येथे १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पतंग उडवताना इमारतीच्या डक्टमध्ये पडून अपघात

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सुरक्षा उपायांचा अभाव

बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

घटनेने परिसरात शोककळा पसरली, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पुणे येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील आंबेगाव खुर्द येथील बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसच्या डक्टमधून पडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यानंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकावर निष्काळजीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्लोक नितीन बांदल असे या मुलाचे नाव असून तो सिद्धिविनायक सोसायटीतील स्वरा क्लासिक बिल्डिंगमध्ये राहत होता.

बांदल हा स्वरा क्लासिक जवळ असलेल्या स्पर्श हाइट्स या सहा मजली इमारतीच्या टेरेसवर पतंग उडवण्यासाठी गेला होता, मात्र त्याचा पाय हा जिन्याजवळ असलेल्या डक्टवरून घसरून खाली पडला. डक्टभोवती रेलिग, बरेकेडिंग आणि कुठलेही सुरक्षाजाळे नव्हते. स्नेहा स्पर्श हाइट्स या इमारतीचे काम सुरू होते तरी देखील पाचव्या मजल्यापर्यंत लोक इमारतीमध्ये राहत आहेत. सहाव्या मजल्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नव्हते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवारी स्नेह स्पर्श हाइट्सच्या बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध (BNS) कलम 106 (1) आणि 3(5) नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अजूनतरी कोणालाही अटक करण्यात आली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com