SSC HSC Exam: 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेत सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण आता मिळणार आहे.
SSC HSC Exam: 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
SSC HSC Exam: 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहितीSaam Tv
Published On

मुंबई : १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना (students) क्रीडास्पर्धेत सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण आता मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. कोविड-१९ (Covid-19) मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये, याकरिता शालेय शिक्षण विभागाने (Education Department) विविध उपाययोजना केले आहेत. (10th and 12th class students will get discounted sports marks Varsha Gaikwad)

हे देखील पहा-

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन (Offline) घेण्यात येणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (Certificate) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या विषयी इयत्ता ७ वी इयत्ता ८ वीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेत सहभाग विचारात घेऊन त्यांना सन २०२१-२२ या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत.

तसेच इयत्ता १२ वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता ९ वी आणि १० वी मधील विद्यार्थ्यांचा क्रीडा (Sports) स्पर्धेत सहभाग विचारात घेऊन सन २०२१-२२ करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

SSC HSC Exam: 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
Stock Market Fall: रशिया- युक्रेन वादाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; Sensex 1000 अंकांनी खाली

ही सवलत केवळ सन २०२१-२२ च्या परीक्षेकरिता राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याची माहिती मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com