सॉरी मम्मी - पप्पा! १०वीच्या विद्यार्थिनीनं किचनमध्ये आयुष्याचा दोर कापला, सुसाईड नोटमधून सांगितलं कारण

Teen Leaves Heartbreaking Note Before Death: मैत्रिणीसोबत क्लासेसमध्ये वाद, दहावीच्या विद्यार्थिनीनं किचनमध्ये आयुष्याचा दोर कापला, नवी मुंबईत खळबळ.
Teen Leaves Heartbreaking Note Before Death
Teen Leaves Heartbreaking Note Before DeathSaam
Published On
Summary
  • दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या.

  • मृत्यूपूर्वी सुसाईड नोटमधून दिलं कारण.

  • रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नवी मुंबईतील घणसोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तळवली भागात राहणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थिनीनं राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललंय. गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली. क्लासेसमध्ये मैत्रिणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून तिनं आयुष्य संपवलं. तिनं गळफास घेतलं असल्याचं कळताच कुटुंबियांनी तिला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून मुलीला मृत घोषित केले. तिनं मृत्यूपूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती.

शमिका नागेश गावडे (वय वर्ष १६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तरूणी घणसोलीती तळवली भागातील रहिवासी होती. ती इयत्ता दहावीत शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिचं मैत्रिणीसोबत भांडण झालं होतं. किरकोळ भांडणावरून मैत्रिणीच्या आईनं शमिकाला घरी बोलावून घेतलं. मैत्रिणीच्या आईनं शमिकाला मारहाण केली.

Teen Leaves Heartbreaking Note Before Death
“ऑल इज वेल!” रेल्वे स्थानकावर महिलेला प्रसुती कळा, व्हिडिओ कॉलवर डॉक्टरची मदत घेऊन 'रँचो'नं केली डिलिव्हरी

हा अपमान शमिकाला सहन झाला नाही. तिनं घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांना शमिकाच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुलीला घेऊन रूग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी तपासून शमिकाला मृत घोषित केले. रात्री आठच्या सुमारास शमिकाची आई घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Teen Leaves Heartbreaking Note Before Death
कबुतरांचा उच्छाद, बाल्कनी अन् खिडक्या घाण; फक्त १ वस्तू वापरा, कबुतरं होतील गायब

आत्महत्या करण्यापूर्वी शमिकानं चिठ्ठी लिहिली होती. यात तिनं सगळी माहिती दिली. तसेच आयुष्य संपवत असल्याचं सांगत आई - वडिलांची माफी मागितली. या प्रकरणी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com