Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी 10 पोलीस निलंबित; पोलीस आयुक्त अंकुश शिंदेची कारवाई

१ पोलीस निरीक्षक २ दोन उपनिरीक्षक आणि ७ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निलंबीत केलं आहे.
Chandrakant patil
Chandrakant patil saam Tv

Chandrakant Patil News - भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ' कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. त्यानंतर काल शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ माजली आहे.

Chandrakant patil
Samruddhi Mahamarg : PM मोदींच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण; असा असेल संपूर्ण दौरा

या शाईफेक प्रकरणी १ पोलीस निरीक्षक २ दोन उपनिरीक्षक आणि ७ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निलंबीत केलं आहे. पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, गणेश माने यांच्यासहीत ७ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबीत केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या शाईफेक हल्ला प्रकरणी कोणत्याही पोलिसाला निलंबीत करुनये अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.परंतु पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

हल्ला होत असताना सिसिटिव्हीत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर हे घटनास्थळावर असताना त्यांच्यावर कारवाई न करता पोलीस शिपाई आणि तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Chandrakant patil
Crime News : बँकेची 1 कोटी 29 लाखांची फसवणूक; गोरेगाव पोलिसांकडून एकास अटक

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

"कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. यावेळी सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. तेव्हा त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा सुरु करायच्या आहेत, पैसे द्या. तेव्हाच्या काळात लोकांनी १० रुपये दिले. आता १० कोटी देणारे लोक आहेत" असं वक्तव्य त्यांनी केलं. पैठणमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com