Exclusive पदवी प्रवेशालाही सीईटी? बारावीच्या निकालानंतर होणार निर्णय

राज्यात अकरावी प्रवेशासाठी जशी सीईटी (प्रवेश परीक्षा) असणार आहे, तशीच सीईटी पदवी प्रवेशालाही घ्यायची की नाही, यावर विचार सुरु आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी तर सीईटी अनिवार्यअसणारच आहे
पदवी प्रवेशालाही सीईटी - उदय सामंत यांची माहिती
पदवी प्रवेशालाही सीईटी - उदय सामंत यांची माहिती
Published On

औरंगाबाद : राज्यात अकरावी प्रवेशासाठी जशी सीईटी (प्रवेश परीक्षा) CETअसणार आहे, तशीच सीईटी पदवी प्रवेशालाही Graduation घ्यायची की नाही, यावर विचार सुरु आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी Education तर सीईटी अनिवार्यअसणारच आहे. मात्र पारंपरिक, अव्यावसायिक पदवी प्रवेशासाठी सीईटी (प्रवेश परीक्षा) घ्यायची की नाही?, याबाबतचा निणर्य बारावीचा निकाल लागल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी 'साम टीव्ही न्यूज'ला दिली आहे. CET may be compulsory for graduate exams hints Uday Samant

कोरोनामुळे Corona यंदा बोर्डाने प्रथमच दहावीचा निकाल शालेय मूल्यमापनाच्या आधारावर जाहीर केला. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांचा विचार न करता २१ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा Examination घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्याच धर्तीवर बारावीचा निकाल लागल्यावर पदवी परीक्षेसाठीही प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार का? यावर सध्या चर्चा सुरू आहे.

हे देखिल पहा

त्याअनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विचार सुरु असल्याचे सांगितले. मात्र, पदवीच्या पारंपरिक कोर्सेसला सीईटी घेत असताना बारावीच्या निकालावर अविश्वास ठेवल्यासारखे होईल का?, याचाही विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले. बारावीचा निकाल लागल्यानंतर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाची सीईटी घ्यावीच लागेल. त्याला 'ऑप्शन''च नसेल. दहावीनंतर पॉलिटेक्निकला सीईटी नसणार आहे. CET may be compulsory for graduate exams hints Uday Samant

बारावीच्या निकालावर अवलंबून असेल शैक्षणिक वर्षाची सुरुवात !

राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष युजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) UGC गाईडलाईन्सप्रमाणे १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याची राज्याच्या उच्चशिक्षण विभागाची भूमिका आहे, तसा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र, बारावीचा निकाल नक्की कधी लागणार आहे, हे उच्च शिक्षण विभागा माहिती नाही. त्यामुळे त्यावर १ ऑक्टोबरपासून अकॅडेमिक वर्ष सुरु होणे निर्भर असेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. CET may be compulsory for graduate exams hints Uday Samant

पदवी प्रवेशालाही सीईटी - उदय सामंत यांची माहिती
विद्यार्थी वर्गात येईनात म्हणून शाळाच आली घरी!

युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ३० सप्टेंबरपर्यत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबरपासून वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहे. नव्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा, शैक्षणिक वर्षासाठीच्या मार्गदर्शक सूचना यूजीसीने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाठवल्या आहेत. आता त्याच अनुषंगाने राज्यातही विचार केला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com