विद्यार्थी वर्गात येईनात म्हणून शाळाच आली घरी!

शिरपूर - विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक अध्यापन करीत आहेत.
शिरपूर - विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक अध्यापन करीत आहेत.

गोंदिया ः कोरोनाच्या दोन्ही लाटेत महाराष्ट्राची वाताहत झाली. लॉकडाउनमध्ये बाजारपेठेसोबत शाळाही बंद कराव्या लागल्या. दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही जनजीवन पूर्वपदावर आलेले नाही. जेथे कोरोनाचे अॅक्टीव्ह रूग्ण कमी आहेत, तेथे प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी पालकांमधील भीतीचे वातावरण कमी झालेले नाही. त्यामुळे ते पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळाच घरी आलीय. गोंदिया जिल्ह्यात हे अनोखे अध्यापन सुरू आहे.

गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर गावात अशी शाळा भरते आहे. गावातील 7 घरांमध्ये वर्ग भरतात. तेथे थोडथिडके नव्हे तब्बल 131 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन करीत आहेत. शिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. Teachers teach students by going to their homes

शिरपूर - विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक अध्यापन करीत आहेत.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यात आता मोजकेच अॅक्टीव्ह (क्रियाशील) रुग्ण उरले आहेत. नियंत्रणात असलेली ही स्थिती बघता शासनाकडून आता शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने पालक आजही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास राजी नाहीत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर मात्र, गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तोडगा काढला आहे.

शिक्षक गावातील 7 घरांमध्ये ते शाळा भरवित आहेत. विशेष म्हणजे 1 जुलैपासून नियमितपणे 131 विद्यार्थी उपस्थिती नोंदवित आहेत. गावातील मुलांचा अभ्यास बुडू नये व त्यांची सुरक्षितता बघता गावकरीही आपल्या घरांत मुलांना शिकविण्यासाठी सहकार्य करीत आहेत.Teachers teach students by going to their homes

अन्य गावांतही होतेय मागणी

घरातील शाळा या उपक्रमांतर्गत एका घरात 21 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वच विषयांचा अभ्यास करवून घेतात. आम्हालाही खूप आनंद येत असल्याचे विद्यार्थी बोलून दाखवित आहेत. खास बाब म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थी कोरोनापासून सुरक्षित असल्यामुळे पालकही संकोच न करता आपल्या पाल्यांना या अनोख्या शाळेत पाठवित आहेत. शिरपूर येथील हा आगळावेगळा उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. अन्य गावांतील नागरिकही असाच उपक्रम राबविण्याची मागणी करीत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. मोबाईल असले तरी रेंजचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी मिळून घरीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जात आहे, असे शिक्षिका अनिता फब्यानी सांगतात.

Edited By - Ashok Nimbalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com