माझ्यावर आरोपांचा काहीही परिणाम होणार नाही: हसन मुश्रीफांचा पलटवार

येत्या दोन आठवड्यात आपण सोमय्या यांच्या विरोधात फौजदारीचा आणि अब्रुनुकसानीचा १०० कोटींचा दावा दाखल करणार
माझ्यावर आरोपांचा काहीही परिणाम होणार नाही: हसन मुश्रीफांचा पलटवार
माझ्यावर आरोपांचा काहीही परिणाम होणार नाही: हसन मुश्रीफांचा पलटवार
Published On

भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit Somaiyya) यांनी माझ्यावर केलेले मनी लॉण्ड्रिंगचे (Money Laundering) आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. माझ्या कंपन्यांची सर्व माहिती कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ज्या दिवशी कारखान्याचे लायसन्स मिळाले त्यादिवशी लोकांनी सतरा कोटी रुपये जमा केले. कारखान्याची कर्ज फेडही झाली, असे सांगत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Gramvikas Mantri Hasan Mushrif) यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर येत्या दोन आठवड्यात आपण सोमय्या यांच्या विरोधात फौजदारीचा आणि अब्रुनुकसानीचा १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही दिला आहे.

हे देखील पहा-

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांनीदेखील पत्रकार परिषद घेत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरणही दिले आहे. दोन वर्षांपुर्वी म्हणजे विधानसभा निवडणूकांच्या वेळीही माझ्यावर आरोप झाले होते. तेव्हाही इनकम टॅक्सने माझ्या घरावर, कंपन्यांवर धाडी टाकल्या पण त्यांना काही मिळाले नाही. किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही, चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनीच त्यांना माहिती दिली असावी. पण त्यांनी इथे येऊन माहिती घ्यायला हवी होती. आता किरीट सोमय्यांनी हवी तिथे खुशाल तक्रार करावी, असा पलटवार त्यांनी केला आहे.

माझ्यावर आरोपांचा काहीही परिणाम होणार नाही: हसन मुश्रीफांचा पलटवार
वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून, किसान सभेच्या मोर्चेकरांनी निषेध व्यक्त केला!

तसेच, भाजपा सत्तेत असताना चंद्रकातं पाटील यांनी घोटाळे केले आहेत. मी देखील रस्ते घोटाळ्या प्रकरणी चंद्रकातदादा पाटील यांच्या विरोधात aniti corporation ला दावा दाखल करणार आहे. चंद्रकांत पाटील यांच धाडस झालं नाही म्हणून त्यांनी किरीट सोमय्यांच्या खाद्यावर बंदूक ठेवली. असेही मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

आपण या लोकांच्या प्रेमासाठी, ऊसासाठी हा कारखाना तयार केला आहे. कारखान्याच नावही सोमय्यांना वाचतता आलं नाही. केंद्रिय गृहमंत्री अमित शहांमुळे चंद्रकांत पाटील यांना मंत्री पद मिळालं होतं. त्यांना महाविकास आघाडीचा सरकार अस्थिर करायचं आहे. यात सोमय्या यांचा काही दोष नाही त्यांना त्या कामासाठी भाजपाने ठेवलंय. असे सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com