वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून, किसान सभेच्या मोर्चेकरांनी निषेध व्यक्त केला!

वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावण्याचे प्रकार सुरू केला आहे.
वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून, किसान सभेच्या मोर्चेकरांनी निषेध व्यक्त केला!
वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून, किसान सभेच्या मोर्चेकरांनी निषेध व्यक्त केला!गोविंद साळुंके
Published On

अहमदनगर : वन विभागाने (Forest Department) शेतात लावलेली झाडे उपटून टाकत अभयारण्यात आंदोलकांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. आदिवासी शेतकरी (Tribal farmers) वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी हिसकावून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हरिश्चंद्र अभयारण्य परिसरात वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये रानटी झाडे लावण्याचे प्रकार सुरू केला आहे. आदिवासींची उभी पिके उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वन विभागाच्या या अन्यायाविरोधात किसान सभा मैदानात उतरली आहे.(Kisan Sabha uproot the trees planted by the forest department and protested)

भर पावसात वाजत गाजत काढण्यात आलेल्या या मोर्चात अभयारण्य परिसरातील 23 गावचे शेतकरी सहभागी झाले आहेत. पारंपरिक वाद्य व क्रांतिकारक घोषणा देत हरिश्चंद्रगड (Harishchandragad) अर्धा चढत हा मोर्चा अभयारण्यातील शेतात नेण्यात आला. शेकडो शेतकरी मोर्चाने डोंगर चढत शेतात पोहचले. शेतकऱ्यांच्या शेतात लावलेली झाडे उपटत यावेळी वन विभागाच्या अन्यायाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या.

वन विभागाने शेतात लावलेली झाडे उपटून, किसान सभेच्या मोर्चेकरांनी निषेध व्यक्त केला!
रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर, तब्बल 90 गुंठे जागा केली खरेदी!

वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या (Farmers) उभ्या पिकांमध्ये लावलेली ही रानटी झाडे उपटून काढण्यासाठी आदिवासी भागात किसान सभेचे कार्यकर्ते (Kisan Sabha workers) मोर्चा काढला शेतात लावलेली वन विभागाची रानटी झाडे उपटून फेकत या अभियानाची सुरुवात केली आहे. किसान सभेच्या पुढाकाराने परिसरातील हजारो गरीब शेतकऱ्यांची वन प्रकरणे पात्र करण्यासाठी अपील दाखल करण्यात आली आहेत. असे असताना कोणत्याही आदेशाची किंवा अंतिम निकालाची वाट न पाहता वन विभाग आदिवासींच्या शेतात अशा प्रकारे घुसणार असेल तर आदिवासींना किसान सभेच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात घुसावे लागेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com