नंदुरबार : नंदुरबारमध्ये (Nandurbar) लग्नाच्या रुढी परंपरेचे बंधन तोडून दीराने कोरोनाने (Covid) मृत्यू झालेल्या भावाच्या पत्नीसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटात विवाह संपन्न झाला आहे. या अनोखे लग्नाच्या (Marriage) बंधनाचा गावातील लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ( Nandurbar News In Marathi )
हे देखील पाहा -
नंदुरबार पोलीस दलात गेल्या ३० वर्षापासून कार्यरत म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांना दोन मुली व एक मुलगा असे अपत्य आहेत. मोठी मुलगी हिचे लग्न झाले. तसेच दुसर्या क्रमांकाची मुलगी चेतना हिला डी.एड. पर्यंत शिक्षण केले. मुलगी चेतनाचे धुळे येथील रहिवासी उच्च शिक्षित पुणे येथे नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले संदिप चंद्रकांत बडगुजर यांच्याशी २०१५ साली विवाहबद्ध करून मोठ्या थाटामाटात विवाह झाला. दोघांचा संसार सुखात चालू होता. त्यांचा संसाररूपी वेलीवर दिव्यांका नावाची कळी उमलली कुटुंबात आनंद उत्सव साजरा झाला. दिव्यांका पाच वर्षाची झाली. कोरोना महामारीत संदिपचा पुणे येथे गेल्यावर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सुखी संसारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले. चेतना देखील पतीच्या विरहाने खचून गेली.
त्यानंतर चेतनाचे वडील सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांनी मुलगी चेतना, नात दिव्यांका हिचा एक वर्ष सांभाळ केला. समाजातील जेष्ठ, श्रेष्ठ, पदाधिकाऱ्यांसह तसेच सासर व माहेरकडील मंडळींनी चेतनाची समजूत घालून विचार विनिमय करून चेतना व दीर हर्षल ऊर्फ किरण यांना भावी जीवनाची भूमिका पटवून सांगितली. चेतना व हर्षल यांनी सर्वांचे मत विचारात घेतले.त्यानंतर दोघांनी एक दुसर्याचा जीवनात येवून खांद्याला खांद्या लावून संसार थाटायचा निर्णय घेतला. मुलगी दिव्यांका हिचे पालन पोषण व भविष्यातील सर्व सुख, दुःख सांभाळण्याची जबाबदारी घेऊन चेतनाचा स्वीकार केला. चेतनानेही दीरासोबत लग्न करण्यास संमती दिली. चेतनाचे आई वडील तसेच हर्षलचे आई वडील, नातेवाईक, समाज बांधवांकडून पुण्यात रूढी परंपरानुसार मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले.
चेतनाचा पती निधनाचे दुःख जीवनात नैराश्य निर्माण करणारे होते. मात्र,दिर हर्षल याने खंबीरपणे साथ देवुन जीवन साथी म्हणून स्वीकारले. चेतनाचा जीवनातील दुःख, विरह नष्ट करण्याचा प्रयत्न हर्षलने केल्याने सर्व स्तरावरून त्यांचावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. दोघांना विवाहबद्ध करण्यासाठी समाजातील जेष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर दिलीप नारायण बडगुजर, राजेंद्र नारायण बडगुजर, दिलीप गिरधर शिंदे, स्नेहलकुमार दिलीप शिंदे, संजय मधुकर बडगुजर, काशिनाथ उत्तम बडगुजर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. म्हसावद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्तीराव पवार यांनी दोघा उभयतांना पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्या विवाहानंतर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.