Dharashiv News: चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या अन् किडे, धाराशिवच्या झेडपी शाळेतील प्रकार; पाहा VIDEO

Dharashiv ZP School: शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषणतत्व असलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि कीडे आढळल्यानंतर धाराशिवमध्ये खळबळ उडाली. पालकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय.
Dharashiv News: चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या अन् किडे, धाराशिवच्या झेडपी शाळेतील प्रकार; पाहा VIDEO
Dharashiv ZP SchoolSaam Tv
Published On

शालेय पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही घटना असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चॉकलेटचे बुधवारीच वाटप करण्यात आले होते. या चॉकलेटमध्ये अळ्या आणि कीडे पाहून पालक संतप्त होत त्यांनी शाळेकडे जाब विचारला.

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषणतत्व असलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि कीडे आढळले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील पाथर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी पोषणतत्व असलेल्या चॉकलेटचे वाटप करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या, किडे आढळल्याची पालकानी तक्रार केली त्यानंतर या अळ्या आणि किडे असलेल्या चॉकलेटचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Dharashiv News: चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या अन् किडे, धाराशिवच्या झेडपी शाळेतील प्रकार; पाहा VIDEO
Dharashiv Bird Flu: ढोकीत बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव; कोंबड्यांनाही लागण

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी, बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रेटिव्ह बार म्हणजेच चॉकलेट दिले जातात. जिल्हा परिषद शाळांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सदरील मिलेट न्यूट्रेटिव्ह बारचा पुरवठा केला जात आहे. विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या या चॉकलेटमध्ये अळ्या, किडे निघाल्याची तक्रार पालकांनी शाळेकडे केली. त्यानंतर आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकाकडून चॉकलेट वाटप बंद करण्यात आले आहे. वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून सांगण्यात आले.

Dharashiv News: चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या अन् किडे, धाराशिवच्या झेडपी शाळेतील प्रकार; पाहा VIDEO
Dharashiv Bandh: सरपंच देशमुख हत्या प्रकरण; धाराशिव जिल्हा बंदची हाक, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com