'हे तिघेच नव्हे 30 पक्ष एकत्र आले तरी...; युवासेनेचं भाजप, शिंदे गटासह मनसेला खुलं आव्हान

'मुंबई महानगरपालिकेची लढाई शिवसेनेची नाही तर मराठी माणसाची लढाई आहे.'
Shinde Group, MNS,BJP
Shinde Group, MNS,BJPSaam TV
Published On

बीड: भाजप, शिंदे गट आणि मनसे हे तीन पक्षच काय, 30 पक्ष एकत्र आले तरी मुंबई महानगरपालिकेवरील भगवा झेंडा उतरवू शकणार नाहीत असं म्हणत युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. ते बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवासेनेच्या निर्धार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते

बीडमध्ये (Beed) आज युवा सेनेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना भाजप, शिंदे गट आणि मनसेने मुंबई महापालिकेसाठी सुरु केलेल्या हालचालींवरुन लक्ष करत टोला लगावला. सरदेसाई म्हणाले, राज्यात भाजपा शिंदे गट आणि मनसे हे तीन पक्षच काय आणखी 30 पक्ष एकत्रित आले तरी मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतररू शकत नाहीत.

पाहा व्हिडीओ -

मुंबई महानगरपालिकेची (BMC Election) लढाई शिवसेनेची नाही तर मराठी माणसाची लढाई आहे. मुंबईत 36 आमदार असताना अमराठी मंत्री दिले जात आहेत. 36 आमदारांपैकी एकही मराठी माणूस आढळणार नाही. मुंबई महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात गेली तर महापौर देखील अमराठीच होईल. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने एकत्रित येऊन याचा विचार करावा असं आवाहन वरुण सरदेसाई यांनी यावेळी केलं.

तसंच आजवरुण सरदेसाईंचा दीपक केसरकरांवर (Deepak Kesarkar) देखील पलटवार केला आहे. माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं, तत्कालीन मंत्रिमंडळातील मंत्री ऐकत नव्हते, बैठकीला उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे 40 आमदारांनी पक्ष सोडला. असं वक्तव्य शिंदे गटाचे गटनेते दीपक केसरकर यांनी केलं होतं.

Shinde Group, MNS,BJP
मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद विद्यापीठात गोंधळ; सत्तारांसमोर भाजपचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न

केसरकरांच्या याच वक्तव्यावर वरून सरदेसाई यांनी पलटवार केला. ते म्हणाले, की आज 3 महिने झाले आहेत, नवीन-नवीन कारणे हे लोकं देत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे, या लोकांनी का सोडलंय. जर त्यांची बाजू आणि ते खरंच सत्याचे असते, तर त्यांना फेसबुक पेजवरील कमेंट 3 महिन्यापासून बंद ठेवण्याची वेळ आली नसती. असं म्हणत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी दीपक केसरकरांवर टोला लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com