मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद विद्यापीठात गोंधळ; सत्तारांसमोर भाजपचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न

सोहळ्याची पूर्व तयारी पाहण्यासाठी विद्यापीठात आलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोरच विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
Aurangabad News
Aurangabad Newsनवनीत तापडिया
Published On

नवनीत तापडिया -

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) स्मारकांचे अनावर होणार आहे.

मात्र, त्यापूर्वीच मंत्री अतुल सावे यांनी विद्यापीठ प्रांगणात कमळ चिन्ह असलेले बॅनर लावले या बॅनरवरून विद्यार्थी संघटना संतप्त झाले असल्याचे पाहायला मिळालं आहे. सोहळ्याची पूर्व तयारी पाहण्यासाठी विद्यापीठात आलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यासमोरच विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. तरी देखील बॅनर न काढल्याने आक्रमक विद्यार्थ्यांनी अतुल सावे यांचा बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी धावं घेत सर्व पदाधिकाऱ्यांना तब्यात घेतल्यामुळे प्रकरण शांत झालं.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, या प्रतकरणाविषयी विचारले असता, जे नियमात असेल त्याप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया व्हावी. सामाजिक विषयात राजकारण नको अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यामुळे आता शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये देखील एका विशिष्ट पक्षाची बॅनरबाजी करण्याची गरज काय असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे. शिवाय मुख्यमंत्र्य़ांच्या दौऱ्याआधीच विद्यार्थ्यांनी केलेल्या या गोंधळामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com