

नवनीत कुमार तापडीया, औरंगाबाद
औरंगाबाद: औरंगाबादमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) राहणारी प्रसिद्ध यूट्यूबर आणि इंटरनेट सेलिब्रिटी असणारी काव्या यादव (Youtuber Kavya Yadav) की काल, शुक्रवारपासून बेपत्ता (Missing) झाली आहे. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काव्या यादव ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी 363 नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काव्या ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा संशय पोलिसांना आहे. (Kavya Yadav Aurangabad News)
काल, शुक्रवारी अभ्यासाच्या कारणावरुन तिचे आणि आई-वडिलांचे भांडण झाले. आई-वडिलांनी तिचा मोबाईल घेतल्याने ती रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कमी वयात काव्याने यूट्यूबवर यशस्वी भरारी घेतली आहे. काव्या यादवच्या यूट्यूब चॅनेलचे नाव बिंदास काव्या (Bindass Kavya) असे असून यूट्यूबर तिचे 4.33M मिलियन सबस्क्राईबर्स (subscribers) आहेत. काव्या ट्रॅव्हल आणि गेमिंग या विषयावर व्हिडिओ बनवते. काव्या यूट्यूबसह इन्स्टाग्रामवरही प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1M मिलियन फॉलोअर्स (followers) आहेत. प्रसिद्ध यूट्यूबर, त्यात अल्पवयीन असल्याने काव्या बेपत्ता होणे हे गंभीर प्रकरण बनले असून पोलिस तिचा शोध घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.