Aurangabad Crime News : सख्या भावडांनी बापाला संपविले, दाेघे अटकेत

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.
Aurangabad, police, arrests, father, son
Aurangabad, police, arrests, father, sonSaam Tv
Published On: 

- नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : रोजच्या त्रासाला कंटाळून दोन मुलांनी (son) बापाचा (father) काठी व गजाने मारून खून केल्याची खळबळ जनक घटना वैजापूर (vaijapur) तालुक्यातील धोंदलगाव (dhondalgaon) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही मुलांच्या विराेधात पोलिसांनी (police) खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दाेघांना पाेलिसांनी अटक (arrests) केली आहे. (Maharashtra News)

Aurangabad, police, arrests, father, son
School Girl Molested By Teacher : नटून थटून आलेल्या मुलीवर शिक्षकाचा पडला डाेळा, टाकला हात; पाेलिस तपास सुरु

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी : सतत दारू पिऊन येऊन आई, आजी-आजोबा आणि मुलांना वडील सतत मारहाण करीत, शिवीगाळ करत त्यामुळे अशा दररोजच्या जाचास कंटाळून दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांचा खून केला. तसेच एका खोलीत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. नारायण रुस्तुम वाघ असे मयताचे नाव आहे.

या घटनेपुर्वी नारायण वाघ आणि त्यांच्या मुलांचे जोरात भांडण झाले. शेत वस्तीवर त्यांचा खून झाल्याचे काही ग्रामस्थांना आढळले. या घटनेत विकास नारायण वाघ, शुभम नारायण वाघ यांना पाेलिसांनी अटक केली आहे.

Aurangabad, police, arrests, father, son
Sneh Sammelan : शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलीच्या वडिलांना भोसकलं; सातारा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल

या दोन्ही संशयित आरोपींना वैजापूर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्यासह पोलीसांचे पथक करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.