
कानठळ्या बसवणारा....कर्कश असा डिजेचा आवाज आता जीवावर बेतू लागलाय. सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत असताना अभिषेक बिराजदार या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. मृत्यूच्या काही क्षण आधी आनंदात डीजेच्या तालावर नाचतानाचा अभिषेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज आता मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याने डॉक्टरांनी मोठ्या आवाजामुळे होणारे धोके अधोरेखित केले आहेत.
डीजेचा साधारणत: 85 डेसिबल पर्यंतचा आवाज माणुस सहन करु शकतो. मात्र, गणेशोत्सवात किंवा एखाद्या मिरवणुकीतील डीजेचा आवाज 145 डेसिबल पर्यंतचा असतो. त्यामुळे आपल्या कानांवर बहिरेपणा तर येतोच, पण त्यासोबत छातीत धडधडणे, हृदयाचे ठोके वाढणे, हृदयविकाराचा झटका येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक त्रास, डोकेदुखी हे त्रास होतात.
जानेवारी 2024 - सोलापूर जिल्ह्यात हळदीच्या वरातीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू
मार्च 2025 - सोलापुरातील कुर्डूवाडीसह परिसरातील 12 ते 14 तरुणांना बहिरेपणा
एप्रिल 2025 - नाशिकमध्ये एका मिरवणूकीत 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू
सप्टेंबर 2024- कोल्हापुरात लेझरमुळे एका तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव
ऑक्टोबर 2024- भोपाळमध्ये डीजेमुळे 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
सप्टेंबर 2024 - छत्तीसगडमध्ये डीजेच्या दणदणाटाने एका व्यक्तीला ब्रेन हॅमरेज
सोलापूरच्या या ताज्या घटनेने तासनतास चालणाऱ्या मिरवणुका आणि त्यातील कर्णकर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने यंदा 'नो डिजे, नो डॉल्बि ,नो लेझर' अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मंडळांना केले आहे. हेच आवाहन आता सगळ्याचं गणेशोत्सव मंडळानं करायला हवं. कारण गणेशोत्सव साजरा करताना डिजे महत्वाचा नाही तर सेवा-श्रध्देचा भाव महत्वाचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.