Yavatmal Crime News : धक्कादायक ! कुमारी मातेची दीड लाखात विक्री; पाेलिसांचे पथक मध्यप्रदेशाला रवाना

पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
yavatmal crime news, police station, madhya pradesh
yavatmal crime news, police station, madhya pradeshsaam tv
Published On: 

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळच्या मारेगांव शहरातील एका कुमारी मातेला नोकरीचे आमिष दाखवून तिची मध्यप्रदेशात दीड लाखात विक्री केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तिच्या आईने तक्रार देताच पोलिसांचे पथक मध्यप्रदेशला अधिक तपासासाठी रवाना झाले आहे. (Maharashtra News)

yavatmal crime news, police station, madhya pradesh
Ratnagiri News: बारसूत बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांची गाडी पलटी, 17 जखमी

शहरात वास्तव्यास असलेल्या एका कुमारी मातेची फसगत झाली आहे. शहरा पासुन काही अंतरावरील एका गावात नाराधमांच्या आमिषाला बळी पडलेल्या एका कुमारी मातेने समाजात सन्माने जगता यावे म्हणून शहराची निवड केली होती.

अविवाहित जीवनात अंकुरलेल्या चिमुकलीचे चांगले संगोपन करता यावे म्हणून ती चांगल्या नोकरीच्या शोधात असताना तीची ही गरज लक्षात घेऊन काहींनी तिच्या संधीचा फायदा घेतला असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

yavatmal crime news, police station, madhya pradesh
Beed APMC Election : सावध व्हा ! बाजार समितीला ते गुटखा, जुगार अन् वाळूचा अड्डा बनवतील, याेगेश क्षीरसागरांची आमदारांवर टीका

पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून (कलम 365, 366,370,376 नुसार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली संशयित आरोपींच्या शोधात एक पोलिस पथक मध्यप्रदेशला रवाना झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com