दुर्दैवी : शेती पिकत नाही कर्ज संपत नाही; दोन्हीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन

पीकं येत नाहीत मात्र दिवसेंदिवस वाढतच जाणारं कर्ज (Loan) यामुळे राज्यातील शेतकऱ्य़ांच्या आत्महत्येच सत्र सुरुच आहे.
दुर्दैवी : शेती पिकत नाही कर्ज संपत नाही; दोन्हीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन
दुर्दैवी : शेती पिकत नाही कर्ज संपत नाही; दोन्हीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवनराजेश काटकर
Published On

परभणी : गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला कोरोना (Corona) काळ अशातच आलेला महापुर आणि या सर्व आपत्ती संपेपर्यंतच आलेला अवेळी पाऊस यामुळे बळीराजा हवालदिलं झाला आहे. पीकं येत नाहीत मात्र दिवसेंदिवस वाढतच जाणारं कर्ज (Loan) यामुळे राज्यात कुठल्या तरी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच (Farmer suicide) सत्र सुरुच आहे. अशाच एका परभणीमधील पाथरी तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने नापिकीला आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

हे देखील पहा -

परभणीच्या (Parbhani) पाथरी तालुक्यात डोंगरगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीला कंटाळुन आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

दुर्दैवी : शेती पिकत नाही कर्ज संपत नाही; दोन्हीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन
'मी चुक केली.. महापौर पदासाठी एका-एका नगरसेवकाला 35 लाख दिले'; आमदारांची जाहीर कबुली (पहा Video)

आत्महत्या करणाऱ्या या तरुण शेतकऱ्यांच नावं नामदेव शिवाजी फासाटे (Namdev Shivaji Fasate) वय (33) असं आहे. दरम्यान शिवाजी यांची आत्महत्या पाथरी पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com