'मी चुक केली.. महापौर पदासाठी एका-एका नगरसेवकाला 35 लाख दिले'; आमदारांची जाहीर कबुली (पहा Video)

15 वर्षापूर्वी आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफयांनी कोल्हापूर महापालिकेतील (Kolhapur KMC) माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं.
'मी चुक केली.. महापौर पदासाठी एका-एका नगरसेवकाला 35 लाख दिले'; आमदारांची जाहीर कबुली (पहा Video)
'मी चुक केली.. महापौर पदासाठी एका-एका नगरसेवकाला 35 लाख दिले'; आमदारांची जाहीर कबुली (पहा Video)SaamTV
Published On

कोल्हापूर : महापालिकेत आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35- 35 लाख रुपये दिले असल्याची कबुली जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी पत्रकारांसमोर दिली मात्र ही आपल्या हातून घडलेली मोठी चूक असल्याचही त्यांनी सांगितलं.

पहा व्हिडीओ -

15 वर्षापूर्वी आमदार विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ (Vinay Kore and Hassan Mushrif) यांनी कोल्हापूर महापालिकेतील (Kolhapur Municipal Corporation) माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं होतं नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती. मात्र सत्ता आणण्यासाठी त्यांनी वापर केलेल्या धनशक्तीची जाहीर कबुली कोरे यांनी पहिल्यांदाच दिली आहे. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली याप्रसंगी आमदार कोरे यांनी ही कबुली दिली.

पक्षाचा महापौर झाला, मलाही बरं वाटलं -

महापालिकेतील त्यावेळी केलेल्या पैशाच्या राजकारणाविषयी बोलताना आमदार कोरेंनी सांगितलं, 'मंत्री हसन मुश्रीफ आणि मी त्यावेळी महापालिकेच्या राजकारणात एकत्र होतो. मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक एकत्र होते. मी तेव्हा जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर केला. मात्र यावेळी भावनेच्या भरात काही गोष्टी घडल्या. पक्षाचा महापौर करण्यासाठी मी एका-एका नगरसेवकाला (To The Corporator) 35-35 लाख रुपये दिले. आमच्या पक्षाचा महापौर झाला, मलापण बरं वाटलं. मात्र या राजकीय घडामोडीमुळे लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. भावनेच्या भरात माझ्या हातून घडलेली चूक मी मान्य करतो अशी जाहीर कबुली त्यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com