State Government Decision: अखेर योगा 'खेळाडूंना' न्याय मिळाला! तांबेंच्या मागणीला यश

Satyajit Tambe : गेल्या तीन अधिवेशनापासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा द्यावा. या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान हा निर्णय झाल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी क्रीडामंत्री संजय बनसोड आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.
Satyajit Tambe
Satyajit Tambe Saam Tv
Published On

State Government decision On Yoga sport :

भारतीय संस्कृतीची ओळख जगाला पटवून देणाऱ्या योगविद्येचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र खेळांच्या यादीत व्हावा, या आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. आमदार तांबे यांनी या मागणीसाठी गेल्या तीन अधिवेशनांमध्ये आणि त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा केला होता. आता सरकारने शासन निर्णय लागू करत योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क, नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.(Latest News)

गेल्या तीन अधिवेशनापासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा द्यावा. या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. हिवाळी अधिवेशनात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत समावेश केला जाईल, असे आश्वासित केले होतं. हा निर्णय झाल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी क्रीडामंत्री संजय बनसोड आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील खेळाडू(Sportsman) , संघटक आणि कार्यकर्ते, मार्गदर्शक यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार (Shiv Chhatrapati State Sports jivan Award), उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati State Sports Award), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग), साहसी क्रीडा पुरस्कार आणि जिजामाता क्रीडा पुरस्कार (Jijamata sports awards) देऊन गौरव करण्यात येतो. परंतु यात कुठेही योग क्रीडा प्रकाराचा समावेश नव्हता.

भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडा प्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

Satyajit Tambe
Satyajeet Tambe on Student : 'महाज्योती'ने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केली, आ. सत्यजीत तांबे यांनी वेधले सरकारचे लक्ष

राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कारपात्र क्रीडाप्रकारांच्या यादीत योगाचा समावेश केला, तर आणखी लोक योगाकडे वळतील, अशी ही मागणी करताना माझी धारणा होती. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतचा शासन निर्णय ३१ डिसेंबरच्या आत जाहीर केला, याचा मला आनंद आहे. हा योगविद्येचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे या निर्णयानंतर दिली.

Satyajit Tambe
Scholarship News: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्काचे १५७८ कोटी रुपये तातडीने वितरीत करा: आमदार सत्यजीत तांबे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com