Yavatmal Accident: CRPF जवनांच्या ३ वाहनांना ट्रकची धडक, एका जवानाचा मृत्यू तर ४ जखमी

CRPF Jawan Vehicles Accident In Yavatmal: यवतमाळमध्ये सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका जवानाचा मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत.
Yavatmal Accident: CRPF जवनांच्या ३ वाहनांना ट्रकची धडक, एका जवानाचा मृत्यू तर  ४ जखमी
CRPF Jawan Vehicles Accident In YavatmalSaam Digital

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये सीआरपीएफ जवानांच्या (CRPF Jawan) वाहनांना अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सीआरपीएफ जवानांच्या ३ वाहनांना भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास यवतमाळ पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक मतमोजणी आटपून सीआरपीएफचे जवान त्यांच्या तीन वाहनाने बीडवरून गडचिरोलीला जात होते. गडचिरोलीच्या दिशेने जाताना यवतमाळच्या धामणगाव जवळ समृद्धी महामार्गावर जवानांच्या वाहनाला अपघात झाला. भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एका जवानाचा जागीच मृत्यू झाला.

Yavatmal Accident: CRPF जवनांच्या ३ वाहनांना ट्रकची धडक, एका जवानाचा मृत्यू तर  ४ जखमी
Nagpur Politics: महायुतीच्या उमेदवाराचा पराभव भाजपच्या जिव्हारी; शहर कार्यकारिणीला बसवलं घरी

या अपघातामध्ये एका जवानाचा मृत्यू तर चार जवान जखमी झाले आहेत. यामधील तीन जखमी जवानांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गिरीश कुमार, अब्दुल रफ आणि तुकाराम मुंडे अशी या जखमी जवानांची नावे आहेत. मृत जवानाचे नाव समजू शकले नाही. अपघातानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी जखमींना भेट देऊन विचारपूस केली.

Yavatmal Accident: CRPF जवनांच्या ३ वाहनांना ट्रकची धडक, एका जवानाचा मृत्यू तर  ४ जखमी
Pune News: धक्कादायक! प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या; कात्रज परिसरातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com