संजय राठोड
यवतमाळ: यवतमाळच्या (Yavatmal) दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली उमरखेड येथील एका प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात विविध चर्चांणा उधाण आले होते. अखेर या खुनाचा (Murder) उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (Yavatmal Crime News)
हे देखील पाहा -
एक ऑगस्टला दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील एका पुलाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवले असता हा मृतदेह उमरखेड येथील प्राध्यापक सचिन वसंतराव देशमुख यांचे असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुन करण्यात आल्याचे समोर आले आहे. सचिन वसंतराव देशमुख, वय-32 राहणार उमरखेड यांच्या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल (Crime) करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. पत्नी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. तर तिचा प्रियकर फॉरेस्ट गार्ड म्हणून वन विभागात कार्यरत आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल पथक करीत आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.