Navi Mumbai News| शेजारचा मुलगा धमकावायचा, ५वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

नवी मुंबईतील रबाळे परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.
Navi Mumbai News Update
Navi Mumbai News UpdateSAAM TV
Published On

Navi Mumbai News Update | रबाळे: नवी मुंबईतील रबाळे येथे धक्कादायक घटना घडली आहे. पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारच्या मुलाकडून तिला वारंवार धमकी दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Navi Mumbai News Update
Beed: बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा; 9 लाखांच्या रोकडीसह पाच तोळे सोने लांबविले

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai) रबाळे येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. पीडित मुलीला शेजारच्या मुलाकडून धमकी दिली जात होती. त्यामुळे त्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.

Navi Mumbai News Update
नवदाम्पत्याचा संसाराचा प्रवास 'त्या' रस्त्यावर कायमचा थांबला, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

नवी मुंबईतील रबाळेमध्ये (Rabale) ही सुन्न करणारी घटना घडली आहे. आत्महत्या करणारी विद्यार्थिनी ही नवी मुंबई शाळेत इयत्ता पाचवी इयत्तेत शिकत होती. या विद्यार्थिनीला तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलाकडून वारंवार धमकी दिली जात होती.

पीडितेला धमकी देणारा शेजारचा मुलगाही तिच्याच वयाचा आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे उघड झाले आहे. ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून वर्गात शांत राहायची. तिच्या वर्गात कुणाशीही ती संवाद साधत नव्हती. या घटनेचा तपास नवी मुंबई पोलिसांकडून (Police) करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com