Le Bonnotte Potato : बाजारामध्ये एखाद्या भाजीची आवक कमी होऊन भाव वाढला की त्या भाजीला सोन्याचा भाव आला आहे असं आपण सहज बोलून जातो. पण खरोखरचं सोन्याच्या भावात बटाटे विकले जातात, असे सांगितले तर तुमचाही विश्वास बसणार नाही. पण ते खरं आहे.
आतापर्यंत आपण फारफार तर 80 ते 100 रुपये किलो रुपयांने बटाटे खरेदी केले असतील. पण त्याचा बटाट्याचा भाव किलोला 50 हजार रुपये असल्याचं सांगितलं तर ते तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे खरं आहे. (Latest Marathi News)
जगात बटाट्याची एक अशी जात आहे त्याला सोन्याचा भाव आहे. या 1 किलो बटाट्यासाठी 40 ते 50 हजार मोजावे लागतात. ले बोनॉट ही एक बटाट्याची (Potato) जात आहे. हा बटाटा दुर्लभ असून तो वर्षांतून केवळ दहा दिवस मिळतो.
ही बटाट्याची जात फ्रान्सच्या Ile De Noirmoutier द्विपवर केली जाते. याचे पीक केवळ 50 मीटर जमिनीवर उगवले जाते. प्राकृतिक रूपाने समुद्रातील शेवाळे आणि शेवाळ्याचा उपयोग केला जातो. हा जगातला सगळ्यात महागडा बटाटा आहे. सोन्याच्या (Gold) भावाचा हा बटाटा खरेदी करण्यासाठी लोक रांगा लावतात.
हा महागडा बटाटा जगातल्या सर्व पाच महाग भाज्यांच्या यादीमध्ये आहे. या बटाट्याची प्रजाती ही आपल्या घरात येणाऱ्या बटाट्यांपेक्षा एकदम वेगळी आहे.ले बोनॉट हे बटाटे विशेषकरून फ्रान्समध्ये आढळून येतात. त्यांचं उत्पादन हे विशेष ऋतुमध्ये घेतलं जातं. या बटाट्यांना विशिष्ट्य अशी चव आहे. त्यांचा वापर सलाड (Salad) आणि भाजी म्हणूनही केला जातो.
दुर्मिळ आणि नाजूक असलेलाला हा बटाटा वर्षातून फक्त 10 दिवस उपलब्ध असतो. हे बटाटे पिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जमिनीतून बाहेर काढताना अलगतपणे बाहेर काढावे लागते. अन्यथा ते खराब होतात. काही रिपोर्टनुसाप या बटाट्यांचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात, असा दावा केला जातो.हा दुर्मिळ बटाटा फ्रान्स व्यतिरिक्त इतर उत्पादित करायचं म्हणलं तर तशी माती, तसं हवामान लागतं. त्यामुळे ते काही इतर ठिकाणी शक्य नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.