bullock cart race : पडळकरांची ही मागणी 'महाविकास' पुर्ण करेल?

त्याला ही राज्य सरकारने विरोध केला हाेता.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSaam Tv
Published On

सांगली : सर्वाेच्च न्यायालयाच्या (supreme court) निकालाने गावागावांत चैतन्याचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्यानूसार आजपर्यंत एकाही बैलगाडा मालकावरील गुन्हा मागे घेतलेला नाही. सरकारने तातडीने बैलगाडा मालकांवरील गुन्हे दाखल मागे घ्यावेत अशी मागणी भाजपनेते गाेपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी (sangli) झरे येथे बैलगाडी शर्यतीबाबत (bullock cart race) न्यायालयात झालेल्या निकालानंतर केली आहे.

गाेपीचंद पडळकर म्हणाले हा निर्णय राज्य सरकारला निर्णय घेता आला असता परंतु त्यांनी घेतला नाही. अखेरीस न्यायालयानेच निर्णय दिला. येत्या आठ दिवसांत बैलगाडा चालक मालकांवर जे गुन्हे दाखल आहेत. ते सरकारने मागे घ्यावेत तरच त्यांना शेतक-यांविषयी बाेलण्याचा अधिकार राहील.

Gopichand Padalkar
वेश्या व्यवसायास भाग पाडल्याने शबानाने हनुमंतचा काढाला काटा

गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यत सुरू व्हावी या मागणीसाठी लढा सुरू ठेवला. त्यासाठी आम्ही झरे येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्याला ही राज्य सरकारने विरोध केला हाेता. मात्र आम्ही गनिमी काव्याने बैलगाडा शर्यत पार पाडली. अनेकांनी यासाठी प्रयत्न केले. त्यांचे मी आभारी मानताे असे पडळकर यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com