Aditya Thackeray : घटनाबाह्य सरकारला आम्ही चर्चेचं आव्हान दिलं पण...; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लबोल

आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेक मुद्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
aditya thackeray and eknath shinde
aditya thackeray and eknath shindeSaam TV
Published On

Aditya Thackeray News : आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात (Nagpur) हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेक मुद्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Ekanth Shinde) निशाणा साधला आहे.

aditya thackeray and eknath shinde
Maharashtra Winter Session : ५० खोके, एकदम ओके...अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन

आधी हे सरकार घटनाबाह्य होतं मात्र आता हे सरकार घाबरटही झालं आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी येताच शिंदे-फडणवीस सरकारमधील दोन मंत्र्यांनी कर्नाटकाला जाणचं रद्द केलं. असं हे घाबरट सरकार असून या सरकारचं करायचं तरी काय? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. घटनाबाह्य सरकारला आम्ही चर्चेचं आव्हान दिलं परंतु त्यांनी ते स्वीकारल नाही. हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

aditya thackeray and eknath shinde
Maharashtra Winter session : आक्रमक विरोधकांना रोखण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार

तसेच हिवाळी अधिवेशनात राज्यसरकारला विविध प्रश्नांवर घेरणार असल्याच त्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. पहिला मुद्दा सीमाभागावर सरकारकडून काही बोललं जात नाही. कर्नाटक या मुद्द्यावर आपलं घटनाबाह्य सरकार काहीच बोलत नाही, या मुद्द्यावरून आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत. दुसरा मुद्दा हा महाराष्ट्रातील प्रकल्पांचा आहे.

महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प पळवून नेण्यात आले आहेत. तर तिसरा मुद्दा हा शेतकऱ्यांचा आहे. तीन महिन्यापूर्वी पाऊस पडला. दोन-तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना कोणताही मदत झाली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com