Wine Price Hike: वाइन महाग होण्याची शक्यता, 'न्यू इअर'च्या पार्टीत खिशाला कात्री लागणार

Wine Shortage in Maharashtra: वाइन पिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. वाइनच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यात आहे. अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांना फटका बसला. त्याचाच परिणाम आता वाइन उत्पादनावर झाला आहे.
Wine Price Hike: वाइन महाग होण्याची शक्यता, 'न्यू इअर'च्या पार्टीत खिशाला कात्री लागणार
Wine Price Hike- Saam Tv
Published On

Summary -

  • वाइनच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे

  • अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले

  • द्राक्ष उत्पादनात जवळपास ६० टक्के घट होण्याचा अंदाज आहे

  • वाइन उत्पादनात १ कोटी लिटरची घट होण्याची शक्यता आहे

  • वाइन उत्पादन कमी झाल्यामुळे त्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे

वाइनच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या पार्टीमध्ये नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला. त्यामुळे वाइन उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचाच परिणाम म्हणून वाइनच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. यामुळे द्राक्ष उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी राज्यातील वाइन उत्पादनातही १ कोटी लिटरची घट होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या घटीमुळे वाइनचे दर वाढण्याची शक्यता आहे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. वाइनसाठीच्या द्राक्ष शेतीचे क्षेत्र १० हजार हेक्टरवरून ६ हजार हेक्टरपर्यंत खाली आल्याची माहिती समोर आली आहे.

Wine Price Hike: वाइन महाग होण्याची शक्यता, 'न्यू इअर'च्या पार्टीत खिशाला कात्री लागणार
Snake Wine Viral Video: हद्दच झाली राव! तरुणांनी प्यायली चक्क स्नेक वाइन; मेकिंग प्रोसेसचा विचित्र VIDEO व्हायरल

राज्याला यावर्षी पावसाने झोडपून काढले. दिवाळीपर्यंत पाऊस पडला. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले. द्राक्षांचे अधिक उत्पादन असलेल्या नाशिक, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना देखील पावसाने झोडपून काढले होते. याठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती देखील होती. यामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या.

Wine Price Hike: वाइन महाग होण्याची शक्यता, 'न्यू इअर'च्या पार्टीत खिशाला कात्री लागणार
थांबा! तुम्हालाही Red Wine आरोग्यासाठी फायदेशीर वाटते? संशोधन काय सांगते जाणून घ्या

सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट झाली जवळपास ६० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच परिणाम वाइन उत्पादनावर झाला असून त्यामध्ये एक कोटी लिटरने घट झाली असल्याचे सांगितले जात आहे. वाइन उद्योगाकडून दरवर्षी २० ते २५ रुपये किलो दराने द्राक्ष खरेदी केले जाते. पण यावर्षी पावसामुळे जास्त नुकसान झाल्यामुळे द्राक्ष प्रति किलो ४० ते ५० रुपयांना मिळणं देखील कठीण झाले होते. द्राक्ष उपलब्ध कमी झाले आणि जास्त किमतीत द्राक्ष खरेदी केले गेले. दरवर्षी ३ कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. पण यंदा १ कोटी लिटरने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता वाइनच्या दरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Wine Price Hike: वाइन महाग होण्याची शक्यता, 'न्यू इअर'च्या पार्टीत खिशाला कात्री लागणार
Wine Shop License: जाणून घ्या...वाईन शॉपचा परवाना कसा मिळवायचा ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com