Nifad News : अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे नुकसान; शेतकरी आक्रमक, वनिता नदीत उतरून आंदोलन

Nashik News : नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचे देखील मोठे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून यामुळे सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे
Nifad News
Nifad NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 
नाशिक
: गेल्या पाच महिन्यांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच गेल्या आठवड्यातील दोन दिवसांच्या अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसान झालेल्या भागांचे सरसकट पंचनामे करण्याच्या मागणीसाठी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नदीत उतरून आंदोलन केले आहे. 

राज्यात मे महिन्यापासून सतत पाऊस सुरु आहे. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. यातच मागील दोन आठवड्यांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यात नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा मोठा फटका बसला आहे. 

Nifad News
Jalgaon Accident : अष्टमीची पूजा करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला; डंपरच्या धडकेत कार पुलावरून कोसळली, आई- मुलाचा मृत्यू

शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन 

निफाड तालुक्यातील उगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक होत द्राक्ष बागांचे सरसकट पंचनामे करावेत, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी; या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी थेट उगाव गावातील विनता नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे.  

Nifad News
Jalgaon : मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा तलावात बुडून मृत्यू; जळगावच्या मेहरूण तलावातील घटना

शेतकऱ्यांना पंचनाम्याचे आश्वासन

दरम्यान अचानक शेतकऱ्यांनी पाण्यात उतरून आंदोलन सुरू केल्याने प्रशासन व पोलिसांची एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रशासनातील अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बाहेर येत चर्चा केली. तसेच पंचनामे करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com