Cabinet Expansion : श्रीकांत शिंदेंना शिक्षण मंत्रालय मिळणार? शिंदेंसेनेच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Will Shrikant Shinde become Education Minister : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळू शकते, असे सिद्धेश कदम यांनी म्हटले आहे.
Shrikant Shinde
Shrikant Shinde
Published On

Shrikant Shinde Union Cabinet expansion : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नव्या शिक्षणमंत्र्यांबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच, शिवसेनेच्या (शिंदे गट) एका मोठ्या नेत्याच्या विधानाने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी खासदार श्रीकांत शिंदे हे केंद्रीय शिक्षण खातं प्रभावीपणे सांभाळू शकतात, असे विधान केले आहे. दरम्यान, प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या शिक्षणमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला.

स्वतः उच्चशिक्षित आणि ऑर्थोपेडिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत शिंदे हे शिक्षण किंवा आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा दावा कदमांनी केल्याने आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात श्रीकांत शिंदेंची वर्णी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिद्धेश कदम म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांनी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींची पूर्ण जाणीव आहे.

Shrikant Shinde
विद्यार्थ्यांना मारण्याचे आदेश कोणी दिले?; राहुल गांधींचं थेट अमित शाहांना पत्र, २ रोखठोक प्रश्नांनी केंद्र सरकार हादरले

श्रीकांत शिंदे हे स्वतः एक डॉक्टर (ऑर्थोपेडिक सर्जन) आहेत. त्यांच्या या वैद्यकीय आणि शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे ते शिक्षण किंवा आरोग्य या दोन्ही क्षेत्रांतील जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने हाताळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी काही जबाबदारी खासदार शिंदेंवर सोपवतील, ती ते १०० टक्के यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वासही सिद्धेश कदम यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात तरुण आणि उच्चशिक्षित चेहऱ्यांना संधी मिळण्याच्या चर्चेदरम्यान सिद्धेश कदम यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा विषय चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com