Amruta Fadnavis News : देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? अमृता फडणवीस यांनी दिलं 'डिप्लोमॅटिक' उत्तर

Devendra Fadnavis News : राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला. मात्र त्यांनी यावर डिप्लोमॅटिक उत्तर दिलं आहे.
Will Devendra Fadnavis Be the Chief Minister of Maharashtra Again? Amruta Fadnavis Gave a Diplomatic Answer
Will Devendra Fadnavis Be the Chief Minister of Maharashtra Again? Amruta Fadnavis Gave a Diplomatic AnswerSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई | ता. 3 डिसेंबर 2023

Will Devendra Fadnavis Be the Chief Minister of Maharashtra Again? Amruta Fadnavis Gave a Diplomatic Answer :

राज्यात भाजपचं बहुमत असतानाही मुख्यमंत्री हे शिंदे गटाचे स्वतः एकनाथ शिंदे आहेत. अशातच राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला. मात्र त्यांनी यावर डिप्लोमॅटिक उत्तर दिलं आहे.

पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, '''महाराष्ट्र्रात देवेंद्र फडणवीस भाजपच्या मागे असून भाजप त्यांच्या मागे आहे. दोघे मिळून महाराष्ट्रात भाजप परत आणणार आहेत.'' भाजपा आता सगळीकडे नंबर वन राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Will Devendra Fadnavis Be the Chief Minister of Maharashtra Again? Amruta Fadnavis Gave a Diplomatic Answer
Chhattisgarh Bjp CM Face: छत्तीसगडमध्ये BJP जिंकली तर कोण होणार मुख्यमंत्री? 'या' नावांची होत आहे चर्चा

दरम्यान, आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार येताना दिसत आहे. तर तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करू शकते, असं दिसत आहे. (Latest Marathi News)

तीन राज्यातील विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता गमावल्याचे चित्र पाहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी निराशा दिसत आहे. मात्र तेलंगणाच्या विजयाने काँग्रेसला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.

Will Devendra Fadnavis Be the Chief Minister of Maharashtra Again? Amruta Fadnavis Gave a Diplomatic Answer
Who Is Revanth Reddy : तेलंगणात BRSच्या सत्तेला सुरुंग लावणारे 'रेवंत रेड्डी' कोण आहेत? ठरू शकतात काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

मुंबईत वपोरज कार्यकर्त्यांचा जल्लोष

मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाने बहुमता पेक्षाही अधिक जागा जिंकत असल्याचं दिसत आहे. भाजपाचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे. या विजयाचा मुंबईतही भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला आहे. भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत ढोल ताशा वाजून नाचत विजयाचा आनंद साजरा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com