Maharashtra Politics : ठाकरे आणि मनसेच्या युतीला ब्रेक? पड्द्यामागे नक्की काय घडतयं? पाहा व्हिडिओ

Raj thackeray and uddhav thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येतील अशी चर्चा असताना ठाकरे पर्वाचं हे स्वप्न अधुरेच राहणार आहे. यामागचं कारण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Maharashtra Politics
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance updateSaam Tv News
Published On

ठाकरे बंधु एकत्र येणार का अशी उत्सुकता साऱ्या महाराष्ट्राराला लागली होती... राज ठाकरेंनी एका मुलाखतीतून उद्धव ठाकरेंना साद घातली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असण्यास तयार असल्याचं सांगितलं. ठाकरे बंधुच्या एकत्र येण्याच्या या चर्चा जोरात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही युती, आघाडीच्या भरवशावर राहू नका असे आदेश दिले आहेत.

Maharashtra Politics
Police Officers Transfers : राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे बदली? वाचा एका क्लिकवर

याआधी राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून परतल्यावर चर्चा होईल, असं सांगण्यात आलं होतं. दोघांच्या परदेश दौऱ्यावरून येऊन 15 दिवस झाले तरी ठाकरे बंधूंमध्ये कुठलीच चर्चा झाली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या या आदेशानंतर 'ठाकरे पर्वा'चे स्वप्न अधुरेच राहणार का असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र याआधी काय घडामोडी घडल्या ते पाहूयात.

Maharashtra Politics
Nashik Politics : ठाकरे गटाची ताकद वाढली; पक्षप्रवेश करताच संदिप गुळवे यांना मिळाली नाशिक शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी

'ठाकरे पर्वा'चे स्वप्न अधुरेच

18 एप्रिल 2025

शिवसेना सोडल्याच्या 19 वर्षांनी राज ठाकरेंच मुलाखतीतून साद घातली

19 एप्रिल 2025

उद्धव ठाकरेंकडून युतीच्य़ा प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद

20 एप्रिल 2025

राऊतांनी युतीच्या चर्चेसाठी कुठलीच अट नसल्याचं सांगितलं

21 एप्रिल 2025

राज ठाकरेंकडून मनसैनिकांना चर्चा करण्यास मनाई

22 एप्रिल 2025

उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले

30 एप्रिल 2025

दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरून परतले

13 मे 2025

शिंदे सेनेचे नेते ठाकरेंच्या भेटीला

16 मे 2025

राज ठाकरेंचे युतीच्या भरवशावर न राहण्याचे आदेश

Maharashtra Politics
Shoking News : भयंकर! आधी 400000 रुपये लुबाडले, मग पेट्रोल टाकून शिक्षकाला जिवंत जाळले

साद, प्रतिसाद ते शिंदेसेनेसोबत युती अशा अनेक चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीच्या अनुषंगाने समोर आल्या. मात्र महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगणाऱ्या ठाकरे बंधूंनीच ठाकरेशाहीला धोका दिलाय का? शिंदे सेनेनं घातलेल्या खोड्यामुळे युती फिस्कटली का? राज-उद्धव ठाकरे युती न करता महायुती आणि मविआची साथ सोडून महापालिका निवडणुकीत 'एकला चलो'ची भूमिका घेणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com