मुंबई : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ला आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. परंतु, अवघ्या नऊ महिन्यांनंतर हा पुतळा कोसळल्याचं समोर आलंय. त्यामुळं विरोधकांनी आता सरकारला घेरलंय, कामाच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलंय. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये सध्या संतापाची लाट आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
या घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केलीय. या पुतळ्याचं कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री या कंपनीला दिलं गेलं (Shivaji Maharaj Statue Collapse) होतं. या कंपनीचे प्रोप्रायटर आणि शिल्पकार जयदीप आपटे हे आहेत. चेतन पाटील या कंपनीत स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम करत होते.
शिल्पकार जयदीप आपटे म्हणतात की...
या घटनेनंतर आता शिल्पकार जयदीप आपटे यांची प्रतिक्रिया समोर (Who is Jaydeep Apte) आलीय. एखादी गोष्ट वाईट झाल्यानंतर करणाऱ्याला जबाबदार धरलं जातं. ही आपल्याकडे पद्धत असल्याचं जयदीप म्हणाले आहेत. पुतळा पडण्याचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. तिथं गेल्यावर खरं कारण कळेल, असं जयदीप आपटे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील जयदीप आपटे २५ वर्षांचे युवा शिल्पकार (Shivaji Maharaj Statue) आहे. जयदीप यांनी भारतीय नौसेनेच्या आदेशानुसार मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा २८ फूट उंचीचा कांस्याचा पुतळा बनविण्याचं काम केलं होतं.
विरोधक आक्रमक...,
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर विरोधी पक्षांनी कामाचा दर्जा आणि पुतळ्याच्या अनावरणात घाई केल्याचा आरोप केलाय. पुतळा पडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका (Jaydeep Apte contactor of Shivaji Maharaj Statue) घेतलीय. वेळेवर गुणवत्ता तपासली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, असं नाईक यांनी म्हटलंय.
सरकारी पातळीवर पुतळा बनवल्यानंतर त्याच्या दर्जाची देखील तपासणी केली जाते. या पुतळ्याचीही व्यवस्थित तपासणी करण्यात आली होती. या पुतळ्याची पाहणी करणारे स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ.चेतन एस. पाटील होते. त्यांनीच पुतळ्याच्या स्थिरतेचे विश्लेषण केलं होतं. राज्य सरकारच्या सहाय्यक अभियंत्याने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्याचं देखील नाव आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.