VIDEO: 'मविआ 225 जागा जिकणार', विधानसभेसाठी काय आहे शरद पवारांचा मेगाप्लॅन? 4 पॉईंट्समध्ये जाणून घ्या

Sharad Pawar's Mega Plan for Maharashtra Assembly Elections: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवून महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा सुपडाच साफ होईल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
'मविआ 225 जागा जिकणार', विधानसभेसाठी काय आहे शरद पवारांचा मेगाप्लॅन? 4 पॉईंट्समध्ये जाणून घ्या
Sharad Pawar's Mega Plan for Maharashtra Assembly ElectionsSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेल्या यशानंतर आता शरद पवार नव्या जोमानं कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणूक जिंकून सत्तांतर करण्यासाठी पवारांनी अभेद्य असं चक्रव्यूह रचायला सुरुवात केलीय.

महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा थेट आकडाच सांगितला आहे. मविआ 288 पैकी 225 जागांवर विजयी होईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय.

'मविआ 225 जागा जिकणार', विधानसभेसाठी काय आहे शरद पवारांचा मेगाप्लॅन? 4 पॉईंट्समध्ये जाणून घ्या
VIDEO: विधानसभेतही जागावाटपाचा तिढा, भाजप 160-170 जागा लढणार? शिंदे-पवार गटाच्या मनसुब्यांना सुरुंग?

लोकसभेला पवारांनी मविआची चांगली मोट बांधली होती. उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या रणनीतीमध्ये नियोजन अचूक ठरलं होतं. लोकसभा निवडणुकीत मविआला 30 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असं भाकीत पवारांनी केलं होतं. हे भाकीत खरं ठरल्यानं पवारांनी आता विधानसभेसाठी मेगाप्लॅन आखलाय.

शरद पवारांचा मेगाप्लॅन काय?

- शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती आहे.

- अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आपल्या संपर्कात ठेऊन विधानसभेला महायुतीला खिंडीत गाठू शकतात

- राष्ट्रवादीकडून मुंबईमधील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने मुंबईत विधानसभेच्या एकूण 6 जागा लढवल्या होत्या. यावर्षी त्याहून अधिक जागा लढवणाचा त्यांचा मानस आहे.

- मविआतील पक्षाची ताकद कुठे कुठे आहे,याचा आढावा घेऊन मविआचा उमेदवार देणार

'मविआ 225 जागा जिकणार', विधानसभेसाठी काय आहे शरद पवारांचा मेगाप्लॅन? 4 पॉईंट्समध्ये जाणून घ्या
VIDEO: विधानसभेतही जागावाटपाचा तिढा, भाजप 160-170 जागा लढणार? शिंदे-पवार गटाच्या मनसुब्यांना सुरुंग?

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट ही पक्षासाठी जमेची बाजू मानली जातीय. त्यात पवारांचा राजकीय अनुभव पाहता विरोधक यावेळी त्यांना हलक्यात घेण्याची चूक करणार नाहीत, एव्हढं निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com